नवी दिल्ली | भारत-चीन सीमासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्राला काही सवाल केले आहे. भारतीय जवानांना निशस्त्र कोणी आणि का पाठविले ? त्यासाठी कोण जबाबदार आहे? असा राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. “निशस्त्र भारतीय सैनिकांची हत्या करुन चीनने फार मोठा अपराध केला आहे. याच अनुषंगाने इथे प्रश्न हा उपस्थित होतो की, धोका असतानाही या वीर जवानांना निशस्त्रपणे कोणी पाठवले ? का पाठवले ? यासाठी कोण जबाबदार आहे ? याची उत्तरे मोदी सरकारने द्यावी”, अशा आशयाचा एक व्हिडिओच आज (१८ जून) राहुल गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. दरम्यान, राहुल गांधींनी यापूर्वीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
कौन ज़िम्मेदार है? pic.twitter.com/UsRSWV6mKs
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2020
राहुल गांधींनी भारत-चीन सीमासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल (१७ जून) पंतप्रधान मोदींना देखील प्रश्न विचारले होते. “चीनची आपल्या हद्दीत घुसण्याची हिंमत कशी झाली. आपल्या जवानांवर हल्ला करण्याची हिंमत कशी झाली ? इतके होऊनही पंतप्रधान काहीच का बोलत नाहीत ? ते शांत का आहेत ? आम्ही सर्वजण एकत्रितपणे पंतप्रधानांच्या सोबत आहोत. त्यांनी घाबरू नये. मात्र, काहीही झाले तरी आता देशाला यामागचे नेमके सत्य काय आहे हे कळायलाच हवे”, अशी मागणी यापूर्वी राहुल गांधींनी केली होती. दरम्यान, त्यानंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित करून चीनला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास आपण पूर्ण सक्षम असल्याचे सांगितले. तसेच केंद्राकडून लष्कराला ‘इमर्जन्सी पॉवर्स’देखील देण्यात आल्या आहेत.
Why is the PM silent?
Why is he hiding?Enough is enough. We need to know what has happened.
How dare China kill our soldiers?
How dare they take our land?— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 17, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.