HW News Marathi
देश / विदेश

सनी लिओनीकडे पॉर्नस्टार म्हणूनचं का पाहिले जाते | हार्दिक पटेल 

इंदूर | इंदूरमधील सभेमध्ये बोलताना पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी सनी लिओनीकडे केवळ एक अभिनेत्री म्हणून का पाहिले जात नाही? प्रत्येकवेळी तिची पॉर्नस्टारची ओळख आड का येते? असा सवाल उपस्थित केला.

आपण नर्गिस, माधुरी आणि श्रीदेवी या नट्यांकडे ज्या नजरेने पाहतो तसेच सनी लिओनीकडे का पाहू नये?, असे अनेक सवाल हार्दिक यांनी उपस्थित केले. आपण हाच दृष्टीकोन ठेवून चालू तोपर्यंत देशात काहीच बदलणार नाही, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले.

भाजपा म्हणजे ‘सत्ता लालची पार्टी’ आहे. जर २०१९ मध्ये निवडणुकांत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्यानंतर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत. ज्या पद्धतीने कर्नाटक निवडणुकांनंतर राज्यपालांनी बहुमत असतानाही काँग्रेस आणि जेडीएसला सत्तास्थापनेची संधी न देता भाजपाला बोलावलं, त्यावरुन देशात घटना संपवण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बजेटमुळे नाराजी, सेन्सेक्स घसरला

News Desk

#Lockdown2 : २० एप्रिलनंतर देशातील ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन शिथील होणार

News Desk

विमान अपघातात १०५ प्रवाशांचा मृत्यू

News Desk