HW News Marathi
देश / विदेश

का पडला किंगखान ममता दिदींच्या पाया

कोलकातामध्ये सध्या 23 वा कोलकाताइंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सुरु आहे. या फिल्म फेस्टविलसाठी बॉलिवूडच्या किंगखानने उपस्थिती लावली होती. या फेस्टिवलनंतर शाहरुख खानला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्यांच्या सॅन्ट्रो कारने एअरपोर्टपर्यंत सोडले. त्यावेळी गाडीतून उतरताच शाहरुखने ममता दिदींच्या पाया पडून आशिर्वाद घेतले. आशिर्वाद घेतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

शाहरुख खान हा पश्चिम बंगालचा ब्रॅड अम्बेसिडर आहे. याखेरीज शाहरुख आणि ममता बॅनर्जींचे चांगले संबध आहेत. सध्या कोलकात्यामध्ये इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हलची धूम आहे. या फेस्टिव्हलसाठी महानायक अमिताभ बच्चन, महेश भट्ट, कमल हसन, काजोल आदी कलाकारांनी हजेरी लावली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

२६ जूनचा ‘चक्का जाम’ ताकदीनिशी यशस्वी करा ! पंकजा मुंडेंचे ऑनलाईन बैठकीत आवाहन

News Desk

एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्सना ‘जय हिंद’ बोलणे बंधनकारक

News Desk

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होणार

News Desk
देश / विदेश

महात्मा गांधींच्या पुतळ्याला लावला मास्क

News Desk

नवी दिल्ली : वाढत्या प्रदुषणामुळे सतत चर्चेत असलेली देशाची राजधानी आणखी एकदा चर्चेत आली आहे. राजधानी दिल्ली प्रदुषणाच्या विळख्यात असल्यामुळे नागरिक हैरान आहेत. या प्रदुषणामुळे श्वसनाच्या आजाराप्रमाणेच आणखी आजार बळावत चालले आहे. या आजारांपासून बचाव व्हावा यासाठी येथील नागरिक मास्क लावून फिरताना आपल्याला दिसतात.

मात्र आता चक्क महात्मा गांधींच्या पुतळ्याला मास्क लावल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीचे निलंबित आमदार कपिल मिश्रा आणि भाजपचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी चक्क महात्मा गांधीच्या पुतळ्याला मास्क लावला आहे. प्रदुषण नियंत्रीत ठेवण्यात आम आदमी पार्टी अपयशी ठरल्याचं सांगत यावेळी निदर्शने देखील करण्यात आली. याप्रकरणी या दोघांनाही चाणक्यपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महात्मा गांधीच्या पुतळ्यासोबतच ११ मुर्तींवरिल असलेल्या आणखीही काही पुतळ्यांना हा मास्क लावण्यात आला आहे.

Related posts

मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण मिळायला अडचण येणार नाही! – छगन भुजबळ

Aprna

पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार असल्याची मोदी सरकारची माहिती, मोठ्या निर्णयाची शक्यता!

News Desk

येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार, महामार्गावर GPS ट्रॅकर लागणार, नितीन गडकरींची घोषणा

News Desk