HW News Marathi
देश / विदेश

पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याचा मायावतींचा निर्णय

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका बहुजन समाज पार्टीच्या (बसपा ) प्रमुख मायावती यांनी जाहीर केली आहे. मायावतींनी समाजवादी पार्टी (सपा ) बरोबर युती तोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात सपा आणि बसपा परस्परांचे कट्टर विरोधक पक्ष होते. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले होते. मात्र मोदी लाटेत सपा-बसपा आघाडीच्‍या दारुण पराभव झाला.

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्यात आघाडी होऊनही सपाचे पारंपरिक मतदार असणाऱ्या यादवांनी आम्हाला मते दिली नाहीत असा आरोप मायावती यांनी केला आहे. त्यानंतर आज (४ जून) पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली. अखिलेश यांनी स्वतःच्या पक्षात आणि भूमिकेत योग्य ते बदल केल्यास पुढच्या निवडणुकीत पुन्हा आघाडी होऊ शकते, असेही त्यांनी बोलून दाखवले. परंतु ते यशस्वी झाले नाहीत तर स्वतंत्र लढण्यातच फायदा आहे. त्यामुळे पोटनिवडणूक आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे मायावती यांनी स्‍पष्‍ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ‘या’ ४ जिल्ह्यांत गेल्या १४ दिवसांत एकही कोरोनाबाधित नाही

News Desk

न्यायालयात जाणं म्हणजे पश्चात्ताप करून घेण्यासारखं ! माजी सरन्यायाधीशांचे विधान

News Desk

१५ हजार महिलांची सुरक्षित प्रसूती करणाऱ्या पद्मश्री सुलागिट्टी नरसम्मा यांचे निधन

News Desk