HW News Marathi
देश / विदेश

शहीद जवानांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार !

मुंबई | पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४४ जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे संजयसिंग राजपूत आणि लोणार तालुक्यातील नितीन राठोड दोन शहीद जवानांचा समावेश आहे. सियाचीन सीमेवर ६ फेब्रुवारीला झालेल्या चकमकीत शहीद झालेले चिखली तालुक्यातील अनिल वाघमारे या तीन शहीदांच्या कुटुंबियांची आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली. “महाराष्ट्रातील या तिन्ही शहीदांच्या गावात त्यांचे स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रयत्न करणार”, असे आश्वासन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद या संघटनेने भारतीय जवानांवर केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये २ महाराष्ट्रातील जवानांचा समावेश होता. रामदास आठवले यांनी या शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेतली. बुलडाण्यातील या तिन्ही शहीदांच्या गावात त्यांचे स्मारक उभारण्याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी आरक्षणासाठी येत्या २६ जूनला राज्यात चक्काजाम आंदोलन ! पंकजा मुंडे आक्रमक

News Desk

आता सरकार बेरोजगारांच्या खात्यात जमा करणार पैसे

Gauri Tilekar

आयसीयूमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Gauri Tilekar