पॅरिस | फ्रान्समध्ये हल्ल्यांची मालिका अजूनही सुरू आहे. दक्षिण फ्रान्समधल्या नाइस शहरात एका चर्चजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. संशयित हल्लेखोराला ताब्यात धेतल्याची माहिती पोलिसांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली आहे.
फ्रेंच वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत क्रूरपणे हा हल्ला झाला. नाईस शहरातल्या नॉत्र दाम चर्चजवळच हल्लेखोरांनी चाकूने थेट हल्ला केला. यात एका महिलेचा शिरच्छेद करण्यात आला. आणखी एक जण रुग्णालयात दाखल करत असतानाच मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी आहेत.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार नाईसच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे आणि आणखी काही जण जखमी आहेत. नाईसचे मेयर ख्रिस्तियन इस्टोर्सी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाव्हायरचे रुग्ण वाढत असून दुसरी मोठी लाट आल्याने पंतप्रधानांनी आजपासूनच लॉकडाऊन जाहीर केला आहे. आता हे दहशतवादाच्या रूपाने नवं संकट देशात आलं आहे.
Three people killed, including a woman who was decapitated, in the knife attack in the French city of Nice, says police. The city's mayor describes the incident as "terrorism": Reuters https://t.co/VCMumIAAt6
— ANI (@ANI) October 29, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.