HW News Marathi
देश / विदेश

कोरोनावर मात करण्यासाठी भारताला वर्ल्ड बॅंकेने दिले आर्थिक सहाय्य

वॉशिंग्टन | कोरोनावर मात करण्यासाठी भारतात अनेक स्थरांकडून अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योजक, राजकीय नेते, खेळाडू, कलाकार, सामान्य नागरिक सगळेच जण आपापल्यापरिने आर्थिक मदत करत आहेत. अशातच वर्ल्ड बॅंकने भारताला १ अब्ज डॉलरची आर्थिक मदत करणार आहे. वर्ल्ड बॅंकच्या सहाय्यता योजनेतून १.९ अब्ज डॉलर पहिल्या टप्प्यात २५ देशांची मदत केली जाणार आहे. तसेच, ४० पेक्षा जास्त देशांमध्ये नवे उपक्रमही राबवण्यात येणार आहे.

दरम्यान, वर्ल्ड बॅंकेक़ून केली जाणारी आर्थिक मदत भारताला करण्यात येणार आहे. जगातील विकसनशील देशांसाठी आपत्कालीन सहाय्यता निधी देण्यात येणार आहे. भारतात १ अब्ज डॉलरच्या अर्थ सहाय्यता निधीतून चांगले स्क्रिनींग, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणेही काही प्रमाणात सोप्पे होणार आहे. तसेच, सुरक्षा उपकरणे खरेदी करण्यासाठीही या निधीची मदत भारताला नक्कीच होईल.

वर्ल्ड बॅंकने पाकिस्तानसाठी २० कोटी डॉलर, अफगानिस्तानासाठी १० कोटी डॉलर, मालदीवसाठी ७३ लाख डॉलक आणि श्रीलंकेसाठी १२.८६ कोटी डॉलरची सहाय्यता करण्याची मंजूरी दिली आहे. जगातील कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी १५ महिन्यांच्या दृष्टीने १६० अब्ज डॉलरच्या आपत्कालीन सहाय्यता निधीच्या योजनेला मंजूरी देण्यात आल्याची माहिती वर्ल्ड बॅंकने दिली आहे. भारतात सद्यस्थितीला २००० हून अधिक कोरोनाबाधित आहेत तर महाराष्ट्रात हा आकडा ४०० च्या पुढे गेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील ३९ रुग्णांना डिस्चार्ज, तर एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२० वर

swarit

आज जाहीर होणार टीम इंडियाचा कोच

News Desk

मी राजकारणाचा बळी | नीरव मोदी

News Desk