HW News Marathi
देश / विदेश

जागतिक छायाचित्र दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या

मुंबई | आज जागतिक छायाचित्र दिन, आज पासून १७७ वर्षा आधी १८३९ मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. फ्रांसने १८३९ ला या आविष्काराला मान्यता दिली. म्हणूनच १९ ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिनच्या रुपात साजरा करतात.

काही वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला आणि छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल… टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले… या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यानिमित्ताने अनेक हौशी फोटोग्राफर आपल्याला पाहायला मिळतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले.

प्रकृतीने प्रत्येक प्राणीला जन्मत: एक कॅमेरा दिला आहे, ज्यामुळे ते प्रत्येक वस्तूच्या छवीला आपल्या डोक्यात अंकित करू शकते आणि तो कॅमेरा म्हणजे आपले डोळे. तस पाहिलं तर प्रत्येक प्राणी एक फोटोग्राफर आहे. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरुवात केली आणि अनेक आविष्कारा सोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला. वेळे सोबत समोर चालतांना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थाई रुपात समोर आणले. याच प्रवासाच्या यशाला आपण ‘फोटोग्राफी डे’च्या रुपात साजरा करतो.

काय / कशी काळजी घ्याल

व्यावसायिक फोटोग्राफी कॅमेरा

फोटोग्राफरना कॅमेरा घेताना फार दक्षता घेतली पाहिजे. कारण आपण कोणत्या प्रकारचे काम करतो, आपल्याला फोटो सर्वात मोठा किती साईजमध्ये करावयाला लागतो, आपण कोणत्या ठिकाणी काम करतो त्याचबरोबर आपल्याला अंदाजे झूम किंवा वाईड लेन्सची गरज किती आहे,हे पाहणे गरजेचे आहे. शिवाय कॅमेरामध्ये ऑडीओ, व्हिडीओची सोय आहे काय, फोकसिंग पॉईंट किती आहे व त्यामध्ये कशा स्वरुपात आपण बदल करू शकतो, याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. कॅमेरा घेतल्यानंतर त्या कॅमेऱ्याबरोबर आलेले कॅटलॉग महत्त्वपूर्ण ठरतात. फोटोग्राफीची भाषा. उदा. ऍपारचर, शटरस्पिड, खडज , व्हाईट बॅलन्स, लार्ज, मेडियम, स्मॉल, फाईन, मेडीयम, बेसिक अशा पद्धतीने चित्रमय माहिती असते.

हौशी फोटोग्राफर

हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे, त्याचा मेगाफिक्सल किती सिमॉस किंवा सीसीडी (कॅमेराचा सेंसर) त्याचा साईज किती आहे. बॅटरी कोणत्या प्रकारची व किती कपॅसिटीची आहे, त्याचबरोबर झूम किती आहे, हे पाहणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारचे कॅमेरे वापरण्यास सोपे असतात.

फोटो काढताना

कॅमेरा हातात धरला व बटन दाबले की ,फोटो आपोआपच येतो पण त्यासाठी आपण योग्य शटर स्पीड, ऍपारचर, आयएसओ, व्हाईट बॅलन्स, संपूर्ण विषयाचा किंवा त्या वस्तूवरती पडलेली लाईट, त्याचबरोबर फोटोच्या चौकटीमध्ये योग्य पद्धतीने बसवणे व त्याचा फोटो काढावयाचे आहे.त्यामधून तो विषय समजला पाहिजे. फोटोग्राफीच्या संपूर्ण माहिती एखाद्याला आहे पण त्याला एखादा विषय मांडता आला नाही तर तो चांगला फोटो घेऊ शकत नाही. म्हणजे एखाद्याकडे चांगला कॅमेरा आहे, चांगली लेन्स आहे. पण त्याला फोटो चांगला काढता येतो असे नाही. त्यासाठी फोटोग्राफीची संपूर्ण तांत्रिक माहिती व त्याचबरोबर कल्पनाशक्तीची सर्वात मोठी गरज आहे. (क्रिएशन) चांगल्याप्रकारे विषय मांडता आला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने चांगल्या फोटोग्राफरचे भरपूर काम पाहिजे म्हणजे त्याप्रकारे आपली कल्पनाशक्तीही तयार होते.

काय आहेत नवी आव्हाने

व्यावसायिक फोटोग्राफरने आपल्या काढलेल्या फोटोंचे फावल्या वेळेत बारकाईने निरीक्षण केले पाहिजे काही फोटोग्राफर चांगले फोटो काढतात पण त्याचे निरीक्षण करत नाहीत. एखादा लग्नाचा अल्बम झाला की, ती फाईल एखाद्या महिन्याच्या तारखेमध्ये सेव्ह केली की, त्याकडे कधीच पाहात नाहीत. कधी कधी काम नसते त्यावेळी जुने फोटो पहायला पाहीजेत. आपल्याला एखादी फ्रेम आवडली की ती वेळीच सेव्ह करावयाची. त्याचबरोबर फोटोग्राफी स्पर्धेमध्ये आपले फोटो पाठवणे गरजेचे आहे. काही फोटोग्राफर असे समजतात की, आपण स्पर्धेत बसणार नाही. पण त्या फोटोची ताकद त्या फोटोग्राफरला नसते. तो स्पर्धेत दिल्यानंतर चांगला विषय किंवा अनेक गोष्टी कळतात. तो फोटो ते सिद्ध करतो. हौशी फोटोग्राफर किंवा व्यावसायिक फोटोग्राफर यांनी कामामध्ये सातत्य व कल्पकता दाखविली तर कोणालाही जागतिक किर्तीच्या फोटोचा मान मिळू शकतो, यात शंका नाही.

जे शब्दात लिहिता येत नाही, जे बोलण्यातून व्यक्त होत नाही, ते या छायाचित्रांच्या माध्यमातून न सांगता व्यक्त होत असते, छायाचित्रकार म्हणजे तो जो साधे दिसत असलेले दृश्यही बोलके करतो. आपण माहिती पुस्तिका व कॅमेरा हातात घ्यावा त्याप्रमाणे रोज एक तास त्यासाठी काढला की १५ दिवसामध्ये कॅमेरा संपूर्ण समजतो. अशा या जागतिक छायाचित्र दिनी त्या सर्व छायाचित्रकारांना ‘एच डब्लू मराठी’ कडून खूप खूप शुभेच्छा…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी आरक्षणासाठी येत्या २६ जूनला राज्यात चक्काजाम आंदोलन ! पंकजा मुंडे आक्रमक

News Desk

कर्नाटकात कोरोना व्हायरसचा पहिला बळी

swarit

‘फरार’ विजय माल्ल्या

News Desk