नवी दिल्ली | राष्ट्रकुल पदक विजेती कुस्तीपटू बबिता फोगाट आणि तिचे वडिल महावीर फोगाट हे बाप लेकीची जोडी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यांची भाजप प्रवेशावर चर्चा रंगल्या होत्या. यानंतर आज (१२ ऑगस्ट) भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त ठरला आहे. बबिताच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत.
Sources: Wrestler Babita Phogat to join Bharatiya Janata Party (BJP), today. (file pic) pic.twitter.com/8LUOoLhWp2
— ANI (@ANI) August 12, 2019
महावीर फोगाट यांनी सरकारने काश्मीरमधील कलम ३७० रद्द करुन ऐतिहासिक निर्णयाचे त्यांनी कौतुक केले आहे. तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याचा सरकारचा निर्णय उत्तम असल्याचे महावीर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
बबिताने हरयाणा पोलीस दलातील निरीक्षक पदाचा राजीनामा दिल्याची माहिती फोगाट कुटुंबाने दिली आहे. महावीर यांनी याआधी जननायक जनता पार्टीसाठी काम केले आहे. जेजेपीच्या क्रीडासंबंधित विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. फोगाट कुटुंब दादरीतील बलाली गावात वास्तव्यास आहे. भाजप प्रवेशानंतर बबिताला विधानसभा निवडणुकीत बाध्रा किंवा दादरी मतदारसंघातून तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.