नवी दिल्ली | राष्ट्रकुल पदक विजेती कुस्तीपटू बबिता फोगाट आणि तिचे वडिल महावीर फोगाट हे बाप लेकीची जोडींनी आज (१२ ऑगस्ट) भाजपमध्ये प्रवेश जाहीर प्रवेश केला आहे. या बाप लेकींची जोडीची जोडी भाजपमध्ये प्रवेश करण्यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. फोगाट कुटुंबियांनी क्रीडा मंत्री किरन रिजिजू यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशाने यासंपूर्ण चर्चेला पूर्ण विराम लागला आहे. महाराष्ट्रसोबतच हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोगाट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Delhi: Wrestler Babita Phogat and her father Mahavir Singh Phogat join Bharatiya Janata Party in the presence of Union Minister Kiren Rijiju. pic.twitter.com/p4itp7hxMX
— ANI (@ANI) August 12, 2019
या पार्श्वभूमीवर बबिताने हरयाणा पोलीस दलातील निरीक्षक पदाचा राजीनामा दिल्याची माहिती फोगाट कुटुंबाने दिली आहे. महावीर यांनी याआधी जननायक जनता पार्टीसाठी काम केले आहे. जेजेपीच्या क्रीडासंबंधित विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. फोगाट कुटुंब दादरीतील बलाली गावात वास्तव्यास आहे. भाजप प्रवेशानंतर बबिताला विधानसभा निवडणुकीत बाध्रा किंवा दादरी मतदारसंघातून तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.