नवी दिल्ली | ‘योग ही भारताने जगाला दिलेली भेट‘, असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेतील योग फॉर पीस या कार्यक्रमत संबोधित करताना बोलत होते. योगासनामुळे आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. आपल्या मनावर शांती टिकवून ठेवण्यासाठी ताकद देते. आरोग्य, कल्याण आणि शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट आहे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले आहे.
When there will be peace in a person's mind there will be peace in family, society, country and the world. Yoga is India's gift to the world for health, wellness and peace: PM Modi at "Yoga For Peace" event in Buenos Aires, Argentina pic.twitter.com/K33uDKKxjf
— ANI (@ANI) November 29, 2018
पंतप्रधान मोदी १३ व्या जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स येथे गेले आहेत. या कार्यक्रमाला ‘योग फॉर पीस’ असे नाव दिले आहे. मला वाटते की या कार्यक्रमाला यापेक्षा चांगले नाव असू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
जी- २० परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था, शाश्वत विकास, हवामान बदल, फरार आर्थिक गुन्हेगार या मुद्यांवर चर्चा होणार आहे. हे मुद्दे केवळ भारत आणि अर्जेंटिनाच्या नव्हे तर जगाच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, असेही मोदी यांनी नमूद केले.
या परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अंतोनियो गुटेरेस, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली आहे. सौदी अरेबियाचे प्रिन्स यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान तंत्रज्ञान, साधनसुविधा, पेट्रोलियम, अन्न सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली आहे.तसेच पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची त्रिपक्षीय बैठक होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.