HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींनी नाकारले सार्क संमेलनाचे निमंत्रण

नवी दिल्ली | भारत आणि पाकिस्तानमध्ये डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडॉरवरुन वाद ताजा असताना पाकिस्तानला आणखी एक दणका मिळाला आहे. इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले होते. पाकिस्तानने काल (२७ नोव्हेंबर) मंगळवारी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु केंद्र सरकारने आज(२८ नोव्हेंबर) पाकिस्तानचे हे निमंत्रण नाकारले.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सार्क संमेलनासाठी निमंत्रण पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, २०१६ मध्ये झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात होणाऱ्या सार्क संमेलनावर सर्व देशांच्या बहिष्कार घातला होता. या पार्श्वभूमीवर यावेळेस पाकिस्तानला सार्क संमेलनाचे आयोजन करण्यासाठी आणि तेव्हाची कमतरता भरुन काढण्यासाठी कोणतीही कसर सोडायची नाहीय. दरम्यान, सार्क संमेलनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. सर्व देशांचे सदस्य मिळून संमेलनाच्या तारखेची घोषणा करतील. यानंतर सर्व देशांना निमंत्रण पाठवले जाईल.

सार्क ही दक्षिण आशियाई देशांनी स्थापन केलेली परिषद आहे. सर्व सार्क सदस्यीय देश परिषदेची तारीख निश्चित करतात. भारतासह अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ हे सार्कचे सदस्यीय देश आहेत. तसेच आज पाकिस्तानमध्ये करतारपूर कॉरिडॉरचे भूमिपूजन होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भविष्यात काहीही होऊ शकते !

News Desk

उर्मिला मातोंडकर यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

News Desk

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या गैरहजेरीबाबत न्यायालयाची तीव्र नाराजी

News Desk
देश / विदेश

चीनमधील केमिकल प्लांटमध्ये स्फोट, २२ जणांचा मृत्यू

News Desk

नवी दिल्ली | चीनच्या उत्तरेकडील हेबेई प्रांतातील झांगजीकौ शहरातील एका केमिकल प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात २२ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २२ जण जखमी झाले आहेत. बीजिंगपासून २०० किलोमीटर ‘दूर हेबेई शेंगुआ’ या केमिकल कंपनीत हा स्फोट झाला आहे. या स्फोटाची झळ वाहनांनासुद्धा बसली असून यामुळे ५० वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.

चिनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील जखमींना इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. केमिकलचा स्फोट झाल्यानंतर प्लांटच्या जवळपासच्या ३८ ट्रक आणि १२ गाड्यांना आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.

Related posts

कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी येडियुरप्पा राज्यपालाच्या भेटीला

News Desk

भारतीय औषधनिर्मिती उद्योगाने जगाचा प्रमुख औषध पुरवठादार बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली पाहिजे! – पियुष गोयल

News Desk

आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, कदाचित या हल्ल्यात मी बचवणार नाही !

Gauri Tilekar