HW News Marathi
देश / विदेश

योगी-मोदींचा नऊ दिवस उपवास

नवी दिल्ली-नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून अनेक जण विविध पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करतात. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मागे नाहीत. कट्टर हिंदू म्हणून दोन्ही नेत्यांची ओळख असून ते नऊ दिवस निरंक उपवास करणार आहे. मोदी गेल्या २८ वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करतात. पहिल्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर ते नऊ दिवसांच्या उपवासात ते फक्त पाणीच पितात. मोदी गेल्या अनेक वर्षांपासून अशाप्रकारे उपवास करत असल्यामुळे त्यांना विशेष त्रास जाणवत नाही. याशिवाय, दस-याच्या दिवशी ते शस्त्रांची पूजाही करतात. २००१ ते २०१४ या काळात गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना मोदी नेहमी आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत शस्त्रांची पूजा करायचे. याशिवाय, गोरखपूर येथील मठाचे अधिपती असणारे योगी आदित्यनाथही नवरात्रीत उपवास करतात. आज ते गोरखनाथ मंदिरात घटाची स्थापना करतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी

News Desk

…प्रेत जेव्हा उठून बसते

News Desk

‘आप’च्या ३ खासदारांना सभापतींनी केले एकदिवसासाठी निलंबीत

News Desk