HW News Marathi
देश / विदेश

फेसबुकवर एक्स गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ चॅट करतना तरूणांने केली आत्महत्या

कोलकाता फेसबुकवर गर्लफ्रेंडसोबत विडीओ चॅट करत असताना एका 18 वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. तरूणाला त्याची एक्स गर्लफेंड दुस-या तरूणासोबत नात्यात अडकल्याची माहिती कळल्यावर तरूणांने त्याच्या एक्सगर्लफेंडला विडीओ कॉल करून तिच्याशी भांडू लागला आणि रागच्या भरात तो गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. तरुणीला बारासातमधील न्यायालयात हजर केले.

दोघांचे कोचिंग क्लासमध्ये त्यांची ओळख झाली होती. तरुणीची अन्य तरुणाशी झालेल्या मैत्रीमुळे तरुण नाराज झाला होता. ज्यावरुन त्यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.

तरुणाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही नेहमी भांडत असतात. त्यांन ब्रेकअपही करायचं होतं. जेव्हा तरुणीने अन्य तरुणासोबतचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले तेव्हा परिस्थिती अजून बिघडली. यानंतर तरुणाने भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता तरुणीने नकार दिला. यावरुन दोघांचं फेसबुकवर व्हिडीओ चॅट करत असताना भांडण झालं.

भांडण झाल्यानंतर नैराश्यग्रस्त झालेल्या तरुणाने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं आणि फेसबुकवर लाईव्ह चॅट सुरु असतानाच गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीला अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यास आम्ही मदत करू शकतो | चीन

News Desk

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल

News Desk

#DelhiViolence : न्यायाधीशांची तडकाफडकी बदली, काँग्रेसची भाजप सरकारवर टीका

swarit