HW News Marathi
देश / विदेश

अमरनाथ हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल मास्टरमाईंड

वृत्तसंस्था- जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सात अमरनाथ यात्रेकरूंचा बऴी घेण्यामागे ‘लष्कर ए तोयबा’ आणि’काश्मिरी हिज्बूल’ या दोन दहशतवादी संघटनेचा हात होता, अशी माहिती आयबीने गृहमंत्रालयाला माहिती दिली.

काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांन सोमवारी बेछुट हल्ला करून सात भाविकांचा बळी घेतला. या दहशतवादी हल्ल्यामागे ‘लष्कर ए तोयबा’ आणि ‘काश्मिरी हिज्बूल’ या दोन दहशतवादी संघटनेचा हात असून पाकिस्तानमधील इस्माइल हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे, असे गुप्तचर यंत्रणाने सांगितले आहे. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज हल्ल्यातील जखमींची भेट घेवून चौकशी केली. या हल्ल्यामागे असलेल्यांना माफ केले जाणार नाही तसेच अमरनाथ यात्रांमध्ये खंड पाडण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे या हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रा सुरूच राहणार असल्याचे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढली

News Desk

पंतप्रधानांची भेट घेऊन सुद्धा राज्याचे प्रश्न मांडले नाही हे राज्याचे दुर्दैव! – सुप्रिया सुळे

Aprna

“आम्हाला देशाच्या स्वातंत्र्यदिनी देशाला भेट द्यायची होती”

News Desk