HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या केरळ प्रदेशाध्यक्षपदी पी. सी. चाको यांची नियुक्ती

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या केरळ प्रदेशाध्यक्षपदी पी. सी. चाको यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली असून पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार प्रफुल पटेल यांनी तसे पत्र दिले आहे. दरम्यान मास्टर पितांबर हे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणून कायम राहतील असेही खासदार प्रफुल पटेल यांनी जाहीर केले आहे. केरळ राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासासाठी कठोर परिश्रम घ्याल असे सांगतानाच पी. सी. चाको यांना यशस्वी कालावधीसाठी प्रफुल पटेल यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

चाको हे चारवेळा खासदार राहिले आहेत. केरळमध्ये विद्यार्थी काँगेसमधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८० मध्ये ते पहिल्यांदा केवळ विधानसभेत निवडूण गेले. त्यावेळी त्यांना उद्योग खाते मिळाले होते. तर १९९१ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. या मार्च महिन्यामध्ये आणखी एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे पी. सी. चाको यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची.

केरळमध्ये काँग्रेस पक्षात लोकशाही उरलेली नाही असं सांगत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते कोणत्या पक्षात सहभागी होतील याविषयी अंदाज लावले जाऊ लागले. परंतु चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन धक्का दिला. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, श्रीनिवास पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Lockdown : नियमांचे उल्लंघन केल्याने लोकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत आहे

News Desk

जर्मनीने असे काय केले ज्याने कोरोनामूळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झाले?

swarit

पावसासाठी दोन पुरुषांचा एकमेकांशी विवाह

News Desk