HW News Marathi
देश / विदेश

आधार’चा डेटा हॅक

बंगळुरु आधारचा डाटा हॅक झाल्याची माहिती समोर आली असून, ‘आधार प्राधिकरणाने’ (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया- यूआयडीएआय) बंगळुरु पोलिसांकडे तक्रार केली आहे. आधार डाटा हॅकिंग प्रकरणी पोलिसांनी आयआयटी खरगपूरचा पदीवधर असलेल्या एका अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे आधारचा डाटा सुरक्षीत नसल्यचे समोर आले आहे यामुळे लोकांनमध्ये एकच चर्चा आहे. ‘यूआयडीएआय’च्या अधिकाऱ्यांनी बंगळुरु पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्यांनी अभिनव श्रीवास्तव आणि त्याच्या क्वार्थ या कंपनीने १ जानेवारी २०१७ ते २६ जुलै २०१७ या कालावधीत आधारचा डाटा चोरी केला आहे. या डाटाचा उपयोग त्यांनी ‘ई-केवायसी व्हेरिफिकेशन’ या अॅपसाठी केला, असल्याचे म्हटले आहे. अभिनव श्रीवास्तव आयआयटी खरगपूरचा पदविधर असल्याचेही ‘यूआयडीएआय’च्या अधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले आहे. अभिनव श्रीवास्तव याच्या कंपनीने एक्स-पे नावाचा मोबाईल पेमेंट ऍप तयार केले होते. जे ऑनलाईन बुकिंगसाठी टॅक्सी सेवा पूरवणीसाठी ओला कंपनीने खरेदी केले होते. ओलाने हे ऍप मार्च 2017 मध्ये खरेदी केले होते. क्वार्थ ही कंपनी अभिनव आणि त्याचा वर्गमित्र प्रीत श्रीवास्तव यांनी मिळून सुरू केले होते. या दोघांनीही 2004 ते 2009 या काळात आयआयटी खरगपूरमधून शिक्षण घेतले. तसेच, 2312 मध्ये क्वार्थ नावाची कंपनीही स्थापन केली. ई-केवायसी नावाचे एक ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होते. या प्रकरणी युजर्सनी अनेक तक्रारी पोलिसांकडे केल्या आहेत सरकारचे अधिकृत अॅप नसताना या अॅपवर आधार कार्डविषयीची माहिती, जन्मतारिख ही माहिती कशी मिळू शकते? अशी युजर्सची प्रमुख तक्रार होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Panama Papers Leak Case: ऐश्वर्या राय-बच्चन यांना EDकडून समन्स

Aprna

लखनऊत गुंडांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार, ८ पोलीस शहीद

News Desk

सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी !

News Desk