HW News Marathi
देश / विदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह AIIMS रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काल रात्री दिल्लीच्या AIIMSमध्ये दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच त्यांना ३-४ दिवसांपासून थकवा आणि अंगदुखी जाणवत होती असे AIIMS रुग्णालयाने पत्रात लिहिले आहे. याआधी अमित शाह यांना ३ ऑगस्टला कोरोना झाला होता. त्यानंतर १४ ऑगस्टला त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली होती. त्यानंतर अमित शाह होम आयसोलेशनमध्ये होते.

अमित शहा यांनी १४ ऑगस्टला कोरोनामुक्त झाल्याचे स्वतः ट्वीट करून सांगितले होते. शाह यांनी ट्वीट करून आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. मात्र आता पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या चिंतेत भर पडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात आजही इंधन दरात घट, पेट्रोल ८२.९४ तर ,डिझेल ७५.६४ रुपये

swarit

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

आता देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास लष्कराला इस्रोची मदत

News Desk