HW News Marathi
देश / विदेश

‘त्या’ व्हिडिओ लिकच्या धमकीमुळं तरूणीची आत्महत्या

नवी दिल्ली – दक्षिण दिल्लीतल्या रूपानगर इथं एका 21 वर्षीय तरूणीनं आत्महत्या केलीय. या तरूणीच्या जुन्या प्रियकराने तरूणीचा व्हिडिओ लिक कऱण्याची धमकी दिली होती. त्यामुळं या तरूणीनं आत्महत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही तरूणी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी होती.

आत्महत्येपूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीच्या आधारावरच पोलिस पुढील तपास करत आहेत. या चिठ्ठीत तिने आपल्या आत्महत्येला जुना प्रियकर जबाबदार असल्याचे लिहिले आहे. “घरच्यांना सोडून माझ्यासोबत आली नाही, तर तुझे फोटो आणि व्हिडिओ ऑनलाईन लिक करेल’ अशी धमकी दिल्याचा दावा तरुणीने चिठ्ठीत केला आहे. तिने मोडल टाऊन पोलिस स्थानकात तिच्या जुन्या प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार केली होती. मात्र त्यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी तरुणीने (8 एप्रिल) तक्रार केली होती, त्याचदिवशी तिने आत्महत्या केली आहे. तरुणीचा जुना प्रियकर हा पाटना येथील असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नीरव मोदी लंडनमध्ये, घोटाळ्याबाबतच्या प्रश्नांवर उत्तर देण्यास दिला स्पष्ट नकार

News Desk

ग्लोबर टीचर रणजीतसिंह डिसले यांना कोरोनाची लागण

News Desk

आज इस्रो करणार दोन ब्रिटिश उपग्रहांचे प्रक्षेपण

Gauri Tilekar
मुंबई

फेरीवाल्यांना हटवा, राज यांचे आयुक्तांना निवेदन

News Desk

मुंबई: राज ठाकरे यांनी बुधवारी महापालिका आयुकत्त अजय मेहता यांची भेट घेऊन रस्त्यांवरून फेरीवाल्यांना त्वरीत हटवण्यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी राज यांनी रेल्वे पूल आणि फुटपाथवरून चालणा-या लोकांच्या समस्याही त्यांच्यापुढे मांडल्या. या निवेदनात राज यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदभार्तील अनेक मुद्देही उपस्थित केले आहेत.

या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करावी. जेणेकरून तिन्ही यंत्रणांच्या समन्वयातून ठोस पावले उचलली जातील. मनसेच्या संताप मोचार्नंतर बहुतांश रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहे. मात्र, हे सगळे किती दिवस टिकेल, असा प्रश्नही लोकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकांना यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी पालिकेने व्हॉटसअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. फेरीवाले बसतात त्या परिसरात हे व्हॉटसअ‍ॅप क्रमांक असलेले फलक पालिकेने लावावेत. जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या परिसरात फेरीवाल्यांकडून होणाºया अतिक्रमणाचे फोटो पाठवता येतील.

Related posts

बेस्ट कर्मचाऱ्यांना पालिकेची दिवाळी भेट

News Desk

तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

News Desk

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर कोसळले

News Desk