HW News Marathi
देश / विदेश

दहशतवाद्यांना जिवंत राहू दिले जाणार नाही

नवी दिल्ली ; ‘दहशतवादी पळून जाऊ शकतात. मात्र त्यांना जिवंत राहू दिले जाणार नाही,’ असे यावेळी डोवाल यांनी मोदींना सांगितले. अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी काश्मीरमधील स्थितीची संपूर्ण माहिती डोवाल यांनी पंतप्रधान मोदींना दिली. गेल्या काही दिवसांमध्ये २५ हून अधिक दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केल्याचेही त्यांनी सांगितले.

अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांवर सोमवारी रात्री हल्ला झाला. दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर केलेल्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. ‘अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याची पूर्वतयारी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती मिळाली आहे. या दहशतवाद्यांच्या ठावठिकाण्याची माहितीदेखील सुरक्षा दलांना मिळाली आहे,’ असे अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले.

अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना हत्यारे पुरवणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यात यश आल्याची माहितीदेखील डोवाल यांनी पंतप्रधान मोदींना दिली. दहशतवादी हल्ला करण्यासाठी कोणत्या मार्गाने आले आणि कोणत्या मार्गाने माघारी परतले, याचीही संपूर्ण माहिती मिळवण्यात यश आल्याचे डोवाल यांनी सांगितले.‘अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या भाविकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना लवकरच संपवण्यात येईल. यासाठी मिनी रडार, उच्च क्षमतेचे ड्रोन आणि हिट सेंसर ट्रॅकिंगचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी ट्रॅकिंग- टॅगिंग-लोकेटिंग-किलिंग पद्धतीचा वापर करण्यात येईल,’ अशी माहिती डोवाल यांनी पंतप्रधानांना दिली.

अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींना अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा सूत्रधार इस्माईलचीही माहिती दिली.‘इस्माईल पाकिस्तानच्या मीरपूरचा रहिवासी आहे. पाकिस्तानातून आल्यावर इस्माईलने दक्षिण काश्मीरमध्ये ४० हून अधिक, तर उत्तर काश्मीरमध्ये ३० हून अधिक दहशतवाद्यांची भरती केली आहे,’ अशी माहिती डोवाल यांनी मोदींना दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावे’ – अरुण जेटली

News Desk

कुख्यात डॉन अबु सालेमच्या अडचणीत वाढ

News Desk

शबरीमला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी उघडणार ?

swarit