HW News Marathi
देश / विदेश

…प्रेत जेव्हा उठून बसते

प्रतिकात्मक छायाचित्र

कर्नाटक- एखाद्या चित्रपटाला शोभेल असा प्रसंग धारवडमध्ये घडला. मनागुंडी गावात एका युवकाची अंतयात्रा सुरु असताना तो उठून बसल्याची घटना घडली. कुमार मारेवाड (वय 17 वर्षे) असे या युवकाचे नाव आहे.

धारवडमधील या घटनेमुळे अंतयात्रेसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांचा मात्र चांगलाच गोंधळ उडाला. या घटनेमुळे सर्व गावकरी आश्चर्यचकित आहेत. दरम्यान कुमारला उपचारासाठी लगेच रुग्नालयात दाखल करण्यात आले. त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याची महिती डॉ. महेश निलकंटन्नवर यांनी दिली. कुमारचे आई-वडील निंगप्पा आणि मंजूळा हे बांधकाम कामगार आहेत. त्यांनी सांगितले की, कुमारने दहावीनंतर शाळा सोडली आणि आम्हाला मदत करण्यासाठी बांधकामाचे काम करु लागला. कुमारचा भाऊदेखिल आजारी असून आम्हाला मदतीची गरज आहे.

कुमारला काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्याला उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, कुमारची प्रकृती सुधारत नाही हे पाहून कुटुंबीयांनी कुमारला घरी आणले. काही दिवस गेल्यानंतर कुमारच्या शरिराने काम करणे बंद केले. कुमारचा मृत्यू झाला असावा असा त्याच्या कुटुंबीयांचा समज झाला. त्यानंतर कुमारवर धार्मिक सोपस्कार करण्यात आले. अंतयात्रेला सुरुवात झाली. त्याला अनेक नागरिक उपस्थित होते. अंतयात्रा स्मशानभूमीपर्यंत पोहोचली आणि कुमारने डोळे उघडले. कुमार हाता-पायांची हालचाल सुरू केली. हे बघून उपस्थितांना धक्काच बसला. त्यानंतर लगेच कुमारला उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले. कुमारला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे डॉक्टर म्हणाले आहेत. या घटनेनंतर परिसरात आश्चर्याबरोबरच भीतीही व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तृप्ती देसाई यांचा १७ नोव्हेंबरला शबरीमाला मंदिरात जाण्याचा निर्णय

News Desk

पंतप्रधानांचा राहुल गांधींना सवाल….

News Desk

इसिसच्या दहशतवाद्यांकडून सुन्नी अरबी महिलांवर बलात्कार

News Desk