HW News Marathi
देश / विदेश

बीडच्या जवानाचा पंजाबमध्ये अपघाती मृत्यू

केज : तालुक्यातील उमरी येथील भूमिपुत्र व भारतीय सैन्य दलातील जवान वसंत अभिमान मुळे यांचे गुरुवारी पंजाबमधील अमृतसर येथे अपघाती निधन झाले.

वसंत मुळे हे गेल्या काही वर्षांपासून सैनिकी सेवेत होते. अमृतसर येथे कर्तव्यावर असताना त्यांच्या जीपला अपघातात झाला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर ही वार्ता कुटुंबियांना कळविण्यात आली.त्यांच्या मागे आई- वडील, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.

वसंत मुळे यांच्या पार्थिवावर शनिवार दुपारी केज (ता. उंबरी) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी त्यांच्या निधनाचे वृत्त गावात धडकल्यानंतर गावकऱ्याना अश्रू अनावर झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, आम्ही मजबूत आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत! – व्होदिमर झेलेन्स्की

Aprna

पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून बंदची हाक, सरकारी बसेसची तोडफोड

swarit

दंतेवाड्यात नक्षलींनी पुन्हा एकदा घडवलेल्या रक्तपाताने हा जुनाच प्रश्न नव्याने विचारावा लागत आहे!

News Desk