HW News Marathi
देश / विदेश

बाबरी मशीद अन्यत्र बांधण्याची वक्फ बोर्डाची तयारी

नवी दिल्ली – अयोध्येतील वादग्रस्त जागा वगळून, त्या जागेपासून काही अंतरावर असलेल्या मुस्लीम समाजाच्या जागेवर बाबरी मशीद बांधता येईल, अशी तयारी उत्तर प्रदेश शिया मध्यवर्ती वक्फ बोर्डाने दर्शविली आहे. सर्वोच्च न्यायालयात बोर्डाने घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेकांना आश्चर्य वाटले असून या प्रश्नावर लवकरच तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.

बाबरी मशीद ही आमची मालमत्ता आहे. त्यामुळे त्याबाबत वाटाघाटी करण्याचा अधिकारही आमचाच आहे, असेही बौर्डाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधांत सुरू असणारी ही सुनावणी जलद गतीने चालविण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.

बाबरी मशीद ही केवळ शिया वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्यामुळे, केवळ तेच याबाबत वाटाघाटी करू शकतात आणि अन्य भागधारकांशी शांततेने तोडगा काढू शकतात, असे म्हणणे सुन्नी वक्फ बोर्डाने मांडले. न्या. दीपक मिस्रा, अशोक भूषण आणि एस. ए. नाझीर यांच्या खंडपीठापुढे गेल्या ११ ऑगस्टपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका 

News Desk

महाराष्ट्रात आमच्यासोबत सत्तेसाठी धोका झाला !

News Desk

आशियातील पहिली ‘यंगेस्ट आर्यन मॅन’ रविजा सिंगल

News Desk