जम्मू-काश्मीर – जातपंचायतीने बलात्कारपीडितेचेमूत्र पिण्याची वादग्रस्त शिक्षा सुनावल्याने आरोपीने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली. फझल हुसेन (२५) असे या आरोपीचे नाव असून तो राजौरी जिल्ह्यात राहात होता. काही दिवसांपूर्वी एका मुलीने फझलवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर स्थानिक जातपंचायतीने शिक्षा म्हणून फझलला संबंधित मुलीचे मूत्रप्राशन करण्याचा आदेश दिला. त्यामुळे तणावाखाली आलेल्या फझलने रविवारी येथील समसार तलावात उडी मारून आत्महत्या केली.
फझल हुसेन हा पदवीधर विवाहित होता. त्याच्यावर एका मुलीने बलात्कार केल्याचा ठपका ठेवला. हे प्रकरण जातपंचायतीकडे नेण्यात आले.त्या वेळी स्थानिक पंचायतीमधील मुफ्तींनी शिक्षा म्हणून फझलने मुलीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी किंवा संबंधित मुलीचे मूत्रप्राशन करावे, यापैकी एका शिक्षा भोगण्यास सांगितले होते. त्यामुळे फझलने दबावाखाली येऊन आत्महत्या केल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान,पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र या प्रकरणात अजून कुणालाही अटक झालेली नाही.
दरम्यान, फझल हुसेन याने आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ मोबाइलवर चित्रित करून ठेवला आहे. आपली बाजू सर्वांना कळावी, यासाठी फझलने आत्महत्येपूर्वी मोबाइल एका नातेवाईकाकडे देऊन ठेवला होता. यामधील व्हिडिओत फझलने मुफ्तींवर आरोप केले आहेत. आपल्या घराच्या चार भिंतींच्या आत लोकांनी न्यायालय थाटले आहे. याच ठिकाणी हे लोक खऱ्या खोट्याचा फैसला करतात आणि न्याय देतात, असा आरोप फझलने केला आहे. केवळ एका मोबाईल संभाषणावरून आपल्याला आरोपी ठरवण्यात आले. मला धमकावून हे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले. लियाकत आणि जब्बार या दोघांनी हे प्रकरण पंचायतीमध्ये नेण्यापूर्वी आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही केल्याचे फझलने व्हिडिओत म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.