HW News Marathi
देश / विदेश

मोदी प्रेमाने जोडपे दुभंगले

वृत्तसंस्थाः मोदी जगभर फिरून आपला प्रचार करत आहे. अनेक भक्तांवर आजही मोदी नावाचे गारूड आहे. अतिरेकी मोदी प्रेमापायी ठिकठिकाणी चर्चा होताना ऐकायला मिळते. काही ठिकाणी टोकाचे वादही होती. कानपूर येथे असेच घडले मोदीच्या धोरणावर टीका करताना एका जोडप्याचा संसार सुरू होण्यापूर्वीच तुटला. एका व्यावसायिकाचे लग्न सरकारी कर्मचाऱ्याच्या एका मुलीसोबत ठरले होते. अगदी शेवटी बोलणी सुरू असताना होणारा नवरा मुलगा आणि मुलगी हे दोघे मंदिरात गेले. तिथे त्यांच्यात देशाच्या आर्थिक स्थितीवरुन चर्चा सुरू झाली. देशाची आर्थिक स्थिती बिघडण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबाबदार असल्याचे मुलगी म्हणाली. त्याला मुलाने केला विरोध. तो मोदींविरोधात काही एक शब्द ऐकून घेण्यास तयार नव्हता. या दोघांमुळे मोदींवरील वाद भयंकर पेटला. शेवटी हे लग्न मोडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्ली उच्च न्यायालयाला आज अर्ध्या दिवसाची सुट्टी 

News Desk

योगीजी राजीनामा द्या, फक्त पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका !

News Desk

प्रफुल्ल पटेल पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

News Desk