HW News Marathi
देश / विदेश

लाल किल्ल्यात घुसले अतिरेकी

नवी दिल्ली – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतीय सीमेत घुसणाऱ्या अतिरेक्यांनी आता देशाची राजधानी नवी दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. गेल्या आठवड्याभरात एक दोन नव्हे, तर चक्क ११ अतिरेक्यांनी लाल किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. आत्मघातकी बॉम्ब बनून, कधी लष्कर- पोलिसांच्या वेषात, तर कधी चक्क भगवी वस्त्र परिधान करून या अतिरेक्यांनी लालकिल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा यंत्रणांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.

अगदी आठवड्याभरावर आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ला परिसरात सुरक्षा यंत्रणांच्या मॉक ड्रील सुरू आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या कार्याक्रमाच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी या मॉक ड्रील सुरू असून त्याअंतर्गत पोलीस आणि निमलष्करी दल परिसरात ‘डमी टेररिस्ट’ पाठवत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी लाल किल्ला परिसर सध्या सामान्यांसाठी बंद करण्यात आला आहे.ठिकठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून चहुबाजूंना प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हींची नजर आहे. या सर्व सुरक्षा यंत्रणांची सतर्कता पडताळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांशी संबंधित लोकंच डमी टेररिस्टच्या वेषात सुरक्षा कवच भेदण्याचा प्रयत्न करत आहे.

गतवर्षी सुरक्षेत निष्काळजीपणा

गेल्या वर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेत निष्काळजीपणा झाल्याची बाब उघडकीस आली होती. त्यामुळे दिल्ली पोलीस, जवान आणि बड्या अधिका-यांना फटकारण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर यंदा डमी टेररिस्टच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यात येत आहे. ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिहेरी तलावर सहा महिन्यांची बंदी, केंद्र सरकारला कायदा करण्याचे आदेश

News Desk

शहरात नेमके किती खड्डे | सर्वोच्च न्यायालय

News Desk

उत्तर प्रदेशात भारतीय वायू सेनेचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले

News Desk