HW News Marathi
देश / विदेश

वासराशी महिलेचा विवाह

वृत्तसंस्था: आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही एकमेकांचे सोबती राहणार अशा आणाभाका लग्नाच्या वेळी घेतल्या जातात. त्याचप्रमाणे आपल्या गेलेल्या पतीचा पुर्नजन्म झाला असून त्याने गायीच्या रुपात पुर्नजन्म घेतला असल्याचा दावा एका महिलेने केला आहे. ही महिला कंबोडिया येथील असून खिम हँग असे तिचे नाव आहे. विशेष म्हणजे या वासराशी लग्न केल्यानंतर ही महिला वासराला आपल्या शेजारी घेऊन झोपते. ही महिला ७४ वर्षांची असून पती गेल्यानंतर तीच्यापुढे दु:खाचा डोंगर उभा राहीला होता. आणि त्यावर तीने हा उपाय शोधून काढला आहे.

हे वासरु या कुटुंबातच राहत असून गेलेल्या व्यक्तीच्या खोलीतच असते. या खोलीच्या खिडकीतून ते बाहेर पहात राहते. हे कुटुंबही या वासराला आपल्यासोबत जेवायला, झोपायला घेते. इतकेच नाही तर टोल यांना आवडणारी त्यांची उशीही हे वासरु आवडीने घेऊन झोपते. या वासराची मी मरेपर्यंत पतीसारखीच सेवा करणार असल्याचे हँग सांगते तर मी गेल्यानंतरही त्याची तुम्ही काळजी घ्या असे ती आपल्या मुलांना बजावते. गावातील अनेक जण या घरात हे वासरु येत असून ते कुटुंबासोबत कशापद्धतीने राहते ते पहायला येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींनी आता रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडून रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे!

News Desk

आपच्या २० आमदारांना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा

News Desk

हिंदू-मुस्लिमांमधील धार्मिक वादामुळे माझ्या वडिलांचा बळी गेला !

News Desk