HW News Marathi
देश / विदेश

सुनंदा पुष्कर मृत्यूचा अहवाल तीन दिवसांत सादर करा, दिल्ली उच्च न्यायालयाचे तपास यंत्रणांना आदेश

नवी दिल्लीः सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांनी व तपास यंत्रणांना बजावले आहेत. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास यंत्रणेचीही स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु तरीही न्यायालयात याबाबत अहवाल सादर करण्यात यंत्रणा कमी पडत आहे, या प्रश्नी भाजपचे नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्याप्रकरणावर गुरुवारी मत मांडताना दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांनी तीन दिवसांत अहवाल मांडण्याचे आदेश दिले आहे. सुनंदी पुष्कर या कॉँग्रेसचे नेते शशी तरूर यांच्या पत्नी आहेत. दिल्लीतील एका अलिशान हॉटेलमध्ये 17 जानेवारी 2014 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याचे गुढ अद्याप उलगडण्यात आलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : माझ्या दुसऱ्या मुलालाही सीमेवर पाठवेन, परंतु पाकिस्तानला धडा शिकवा !

News Desk

“शेजारी पाहा काय घडतय”, मेहबूबा मुफ्ती यांचा पंतप्रधानांना इशारा

Jui Jadhav

एनडीटीव्हीचे प्रमोटर प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्यावर सेबीची मोठी कारवाई

News Desk