HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

भारतातील पहिली सुवर्णपदक विजेती महिला कुस्तीपटू

कुस्ती क्षेत्रात गीता फोगाट या पहिल्या महिला कुस्तीपटू म्हणून ओळखले जाणारे नाव आहे.ज्याप्रमाणे त्यांनी कष्ट आणि मेहनत करून आपले ध्येय गाठले त्याचप्रमाणे त्या लाखो मुलींसाठी प्रेरणादायी ठरल्या. गीता ह्या ओलंपिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. २०१० राष्ट्रकुल खेळामधील ५५ किलोग्राम वजनाने सुवर्ण पदक जिंकून गीताने भारत देशाचे नाव प्रकाशित केले.

गीता फोगआटचा जन्म १५ डिसेंबर १९८८ मध्ये हरियाणातील एका छोट्याश्या गावात झाला होता. गीताचे वडील कुस्तीपटू होते आणि आई गृहिणी होत्या. आजही, आपल्या देशात केवळ मुलांच्याच जन्मला प्राधान्य दिले जाते. गीताच्या पालकांचीही अशीच विचारधारणा होती. परंतु फोगाट जोडप्याने विचार करण्याची दिशा बदलली आणि आपल्या मुलींना कुस्तीपटू बनवले. बाहुल्यांबरोबर खेळण्याच्या वयात, गीतांना तिच्या वडिलांच्या प्रशिक्षणाखाली कठोर परिश्रम करावे लागले. मुलगी असून कुस्ती कशी खेळणार असा प्रश्न पूर्ण गाव गीताच्या वडिलांना करत असे. समाजाला सामोरे जाणे हे गीताच्या वडीलांना कठीण होते. पण अशा समस्यांना सामोरे जात त्यांनी गीता आणि गीताची बहीण बबिताला कुस्तीपटू बनवले.

गीता फोगाटच्या करियरची सुरुवात जालंदरमध्ये २००९ला झालेल्या कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पियनशिपने झाली होती. या स्पर्धेत गीतांनी पंजाबच्या विरोधात पहिले सुवर्ण पदक पटकावले होते. गीताने२०१०ला राष्ट्रकुल खेळामध्ये तर २०१२ला उन्हाळी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. २०१२ साली विश्व कुस्ती चैंपियनशिप मध्ये कांस्यपदक मिळवले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।

News Desk

समाजातील व्यसनाधीनतेच्या विरोधात ‘ती’ खंबीरपणे उभी

News Desk

आजचा रंग लाल, ‘कालरात्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar
नवरात्रोत्सव २०१८

समाजसुधारक रमाबाई रानडे

News Desk

एकोणिसाव्या शतकात झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, लक्ष्मीबाई टिळक, मादाम कामा, अशा कर्तृत्ववान स्त्रिया जन्माला आल्या. त्यामध्ये रमाबाई रानडे यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.रमाबाई रानडे’ ह्या भारतातील पहिल्या स्त्री आहेत ज्यांनी १८८३ मध्ये झालेल्या सभेला उपस्थिती लावून इंग्रजीत भाषण केलं.अनेक समाजसुधारकांपैकी रमाबाई या एक श्रेष्ठ समाजसुधारक होत्या ज्या महिलांच्या हक्कांसाठी झगडत होत्या.सेवासदन रमाबाई रानडे यांच्या विचारातून, कष्टातून उभं राहिलं.

रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म सातारा जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती.२५ जानेवारी १८६२ साली जन्मलेल्या रमाबाईंचा विवाह महादेव गोविंद रानडे यांच्यासोबत वयाच्या ११व्या वर्षी झाला. रमाबाई आणि महादेव रानडे यांच्यामध्ये २१ वर्षांचे अंतर होतं. अजाणत्या वयात त्यांना योग्य जोडीदार लाभला. रमाबाईंना नवीन गोष्टी शिकण्याचे कुतूहल आणि ज्ञानाची भूक होती. त्याच गोष्टीला त्यांचे पती महादेव रानडे यांच्यामुळे आणखीनच प्रेरणा मिळाली. महादेव रानडे यांनी रमाबाईंना मराठी आणि इंग्रजी लिहायला आणि वाचायला शिकवले. दिवसातून केवळ २ तासाच्या शिकवणीतून रमाबाई लिहायला आणि वाचायला शिकल्या.

न्यायमूर्ती रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतले होते. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी ‘हिंदू लेडीज सोशल क्लब’ची मुंबईमध्ये स्थापना केली. अनेक स्त्रियांच्या सक्रिय सहभागातून आणि मदतीने त्यांनी १७ नोव्हेंबर १८८४ रोजी पुण्यात मुलींसाठी शाळा सुरु केली.अल्पवयीन मुलींचं देवधर्माच्या नावाखाली केलं जाणारं लैंगिक शोषण थांबवावं, म्हणून रमाबाईंनी सर भांडारकरांनी गव्हर्नरला पत्र लिहिलं. त्यांनी त्यांचा ‘जीवनपट’ आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवला आहे.

रमाबाईंचं आजपर्यंत चालू असलेलं महत्त्वाचं काम म्हणजे ‘सेवासदन’ ही संस्था. मुंबईत पारशी सुधारक बहेरामजी मलबारी व दयाराम मिट्टधमल यांनी १९०७ मध्ये ‘सेवासदन’ ही संस्था सुरू केली. त्या संस्थेचे सल्लागार सर भालचंद्र भाटवडेकर यांनी रमाबाईंना पत्र पाठवून संस्था कशी असावी याची योजना तयार करायला सांगितली. वेगवेगळ्या समित्या स्थापन करून माननीय स्त्री-पुरुष सदस्य झाले आणि ११ जुलै १९०८ रोजी रमाबाईंच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन रीतसर ‘सेवासदन, मुंबई’ ही संस्था स्थापन झाली. या संस्थेचे उपनाव ‘सिस्टर्स ऑफ इंडिया सोसायटी’. मुंबईतील ‘सेवासदन’ नीट चालू झाल्यावर पुण्यात ‘सेवासदन’ सुरू करावं असं ठरलं.

Related posts

नवरात्रोत्सवाची २९ वर्षांची अखंड परंपरा, चेतनाची माऊली

Gauri Tilekar

आजचा रंग केसरी, स्कंदमाता रूपात घ्या देवीचे दर्शन

News Desk

घटस्थापना का करतात, तुम्हाला माहित आहे का ?

Gauri Tilekar