HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

आजचा रंग केसरी, स्कंदमाता रूपात घ्या देवीचे दर्शन

नवरात्रीच्या पाचव्या माळेला आई जगतजननी स्कंदमाता या रूपात दर्शन देत आहे. आई स्कंदमाता सिंहारूढ झालेली आहे. एका हाताने कुशीत बसलेल्या षढानन (सहमुख असलेले) बाळ कार्तिकेयला धरले आहे. तसेच दोन हातात पद्म पुष्प धारण केले असून, चौथ्या हाताने भक्तांना वरदान देत आहे. अश्विन शुद्ध पंचमी स्कंदमाता हे आदिमाया आदिशक्तीच्या नवदुर्गा अवतारातील पाचवे रूप आहे. आपल्या सणवारांत पाच पंचम्या अति महत्त्वाच्या मानल्या जातात, १. रंगपंचमी २. नागपंचमी ३. ऋषिपंचमी ४. ललिता पंचमी ५. वसंत पंचमी.

प्रामुख्याने ललिता पंचमीला कुमारी पूजन केले जाते. घरात गोमूत्र शिंपडून सुगंधित धूप करावा. विधी – पाच, सात, नऊ अशा संख्येने सात वर्षांपर्यंतच्या लहान मुली घरी आणून त्यांना आसनावर बसवावे. नंतर त्यांचे पाय धुवून डोक्यावर केसांच्या भांगात दोन बोटाने तेल लावावे. कपाळाला हळद-कुंकू लावून रुमालात देवीला आवडणारा विविध प्रकारचा प्रसाद घालून त्यांची ओटी भरावी. आपल्याला यथाशक्ती भोजन घालावे किंवा दुधाची खीर द्यावी आणि प्रत्येकी एक केळ द्यावे. आरती सजवून अक्षता वाहाव्यात. गुलाब, चाफा किंवा फुलांचा गजरा अर्पण करावा. मनोभावे त्यांना नमस्कार करून जाणता अजाणता काही चुकले असल्यास त्यांची क्षमा मागावी आणि अखंड कृपा दृष्टी असावी अशी प्रार्थना करावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विक्रोळीच्या दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाची सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल

News Desk

नवोदित मंडळाची माऊली

News Desk

शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ

Gauri Tilekar