HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

आजचा रंग निळा, ‘शैलपुत्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

आश्विन शुद्ध शारदीय नवरात्री आरंभी प्रथम दिवशी देवी ‘शैलपुत्री’ या रूपात भक्तांना दर्शन देते.

देवी शैलीपुत्रीची आराधना कशी केली जाते

ओम शैलपुत्री माताय नमः वंदे वांछित लाभाय चंद्राद वकृतशेखराम | वृषारूढ शूलधारा यश स्विनीम ||

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून वरील मंत्राचे पठण करून देवीची आराधना केली जाते. द्विभुज शैलपुत्री ही देवी वृषभावर आरूढ झालेली असते. तसेच देवीने उजव्या हातात शूल डाव्या हातात पद्म आणि मस्तकी चंद्राची कोर धारण केलेली असते.

हिंदू धर्मात कोणत्याही पूजेचा आरंभ करताना कलश सजवून त्याची पूजा करतात. कोणत्याही शुभ कार्याच्या शुभारंभाच्या वेळी कलश पूजा अग्रगण्य मानली जाते. कारण कलशाला सर्वसामान्य भाषेत ‘घट’ असे म्हटले जाते. कलश गणेश, शिव, शक्ती, विष्णू आणि सूर्य यांचे प्रतीक मानले जाते. वेदात, पुराणात, विज्ञानात, सामाजिक सर्व क्षेत्रात कलशाचे महत्त्व दिले आहे.

देवीच्या मूळ प्रकृती आदिमाया, आदिशक्ती तिची ही प्रमुख रूपे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. या प्रत्येक रूपाची तीन रूपे अशी होऊन देवीची ९ रूपे आहेत. याच नवदुर्गा म्हणून प्रसिद्ध आहेत. कलश पूजेने महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, ९ दुर्गा, ब्रम्हा, विष्णू, महेश, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सप्तसरिता, सप्तसागर, सप्तमातृका, सप्तचिरंजीव, सप्तकुलदैवत प्रसन्न होतात. म्हणून घरोघरी कलशपूजा आवर्जून केली जाते.

नवरात्र शुद्ध प्रतिपदा घटस्थापना कशी केली जाते

मातीचा घट किंवा तांब्या घेऊन त्यावर अनामिका बोटाने श्री, ओम, स्वस्तिक आणि त्रिशूल काढावे किंवा दोन बोटे कुंकवाची, दोन बोटे हळदीची, घाटाच्या तळापर्यंत ओढतात. घटाच्या गळ्याला गजरा किंवा वेणी बांधून त्यात स्वच्छ पाणी, हळद, कुंकू, गंगाजळ, गुलाबपाणी, गोमूत्र घालतात. बेल, तुळस, दुर्वा, इतर रंगीत फुले वाहून कलशात सव्वा रुपया आणि सुपारी घातली जाते. एक नारळ घेऊन त्यावर स्वस्तिक काढून हळद कुंकू लावून नारळावर गजरा- वेणी घालून तो नारळ घाटावर ठेवला जातो. त्याआधी कलशामध्ये ५ ते ७ आंब्याची पाने कमळाच्या पाकळ्यांसारखी रचली जातात. कलश तयार करून एक टोपली घेऊन त्यात माती टाकून १८ धान्य पेरली जातात. त्यानंतर तो घट दोन विड्याच्या पानांवर ठेऊन घटस्थापना केली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजचा रंग करडा, ‘कृष्माण्डा’ रूपात घ्या देवीचे दर्शन

News Desk

भारतातील पहिली सुवर्णपदक विजेती महिला कुस्तीपटू

News Desk

नवसाला पावणारी टेंभी नाक्याची देवी

Gauri Tilekar