HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

आजचा रंग करडा, ‘कृष्माण्डा’ रूपात घ्या देवीचे दर्शन

अश्विन शुद्ध चतुर्थीला आई जगतजननी ‘कृष्माण्डा’ स्वरूपात दर्शन देते. आई कृष्माण्डा अष्टभुजा असून, वाघावर आरूढ झाली आहे. शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्यबाण, अशा प्रकारची पाच शस्त्रे पाच हातात तर कमंडलू, अमृतकुंभ आणि जपमाळ अशा अद्भुत आणि शुभ गोष्टी सांकेतिक अर्थाने धारण केल्या आहेत. कृष्माण्डा देवी ही विश्वव्यापक जननी म्हणून देखील संबोधली जाते. हे चराचर विश्व पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश: त्रिभुवन, दशदिशा; नवग्रह, नवनाग, सूर्य, चंद्र, तारे, शेषनाग, पंचप्राण, दशेंद्रिय, पिंडी ते ब्रह्मांडी अशी व्यापून आहे.

कृष्माण्डा देवीने भगवी वस्त्रे परिधान केली असून त्या भगव्या वस्त्रात तिचे रूप अत्यंत विलोभनीय दिसते आहे. या जगतजननीपासून चराचर विश्व निर्माण झाले असल्याने तिच्या हातात कमंडलू-भोजन, जलकुंभ -जीवांमृत, जपमाळ-८४ लक्ष योनीचा फेरा आहे. ही देवी जगाचे रहाट गाडगे सांभाळणारी आहे म्हणून तिची दृष्टी दयाद्रया, कारुण्यसिंधू, वात्सल्यसिंधू व प्रसन्न अंतःकरणाची आहे. म्हणून अशा विश्वमोहिनी जगतमातेला देवसुद्धा लोटांगण घालतात, असे म्हटले जाते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बहिणाबाईंचे अनमोल काव्य

News Desk

आजचा रंग पांढरा, ‘कात्यायनी’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar

आजचा रंग पिवळा, ‘ब्रम्हचारीणी’ रूपात घ्या देवीचे दर्शन

News Desk