HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

अंधत्वावर मात करत ‘ती’ वाजवते ६० हून अधिक प्रकारची वाद्ये

श्वेता खामकर | समाजात अनेक असे अंध, दिव्यांग लोक राहतात. त्यांपैकी काही जण अंधत्वामुळे खचून जातात, तर काही जण जिद्दीने विशेष अशी कामगिरी करून दाखवतात. ज्याने समाजाला प्रेरणा मिळते. अशीच विशेष कामगिरी करणाऱ्या योगिता तांबे या अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. योगिता तांबे या मुंबईत जोगेश्वरीमध्ये राहतात. सध्या त्या जोगेश्वरीमधील अस्मिता शाळेमध्ये संगीत शिकवतात. महत्त्वाची बाब म्हणजे त्या अंध असून ६० ते ६५ प्रकारची वाद्य वाजवता.

योगिता तांबे यांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला. त्यांना वाद्य वाजविण्याची आवड लहानपणापासूनच होती. त्यांचे आजोबा त्यांना लहान असताना भजनाच्या कार्यक्रमाला घेऊन जायचे. कालांतराने त्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबईत स्थायिक झाल्या. योगिता लहानपणापासून अंध नव्हत्या. परंतु जसजसे वय वाढत गेले तसतशी त्यांची दृष्टी कमी होत गेली. वाद्य वाजविण्यासोबत त्यांना चित्र काढायची देखील आवडत होती. त्यांना दिसत होते त्यावेळी त्या चित्र ही काढत होत्या.त्यांनी दादर मधील कमला मेहता या शाळेत शिक्षण घेतले. त्यांनी मुंबईतल्या रुईया महाविद्यालयांतून इतिहास विषयामध्ये पदवी मिळवली आहे. calligraphy चे देखील शिक्षण घेतले आहे.

योगिता सांगतात , “मी लहान असताना घरातल्या सगळ्या गोष्टी वाजत बसायचे. मला चाली पेक्षा रिदम पटकन लक्षात राहतात. त्यांनतर मला माझ्या घराच्यानी तबला शिकण्यासाठी क्लास लावला”. योगिता ६ वी मध्ये असताना त्यांना अल्ल्हारखा इन्स्टिटयूटची स्कॉलरशीप मिळवून दिली. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना, त्यांनी नाटकांमध्ये वाद्य वाजून त्यांनी त्यांची कला सादर केली. सध्या त्या ६० ते ६५ प्रकारची वाद्ये वाजवतात. त्यांनी ५० वाद्ये एकत्र वाजविण्याचे रेकॉर्ड केले आहे.

योगिता यांना त्यांच्या आई व मावशीची साथ लाभली. त्यांच्या आई सांगतात की, योगिता तिची दुःख कवटाळत बसली नाही. तिने तिच्या सगळ्या नकारार्थी गोष्टी मागे टाकून तिला ज्या गोष्टीतून आनंद मिळत आहे ती त्या करत गेली. ती खूप धाडसी आहे. योगिताला आता पर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

योगिता यांच्या मते त्यांच्याकडे जे विद्यार्थी शिकायला येतात. ते माझा क्लास एन्जॉय करतात हाच माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे. योगितांना त्यांच्या आयुष्यात अनेक ठिकाणी अडथळे येतात. पण अंधत्वापेक्षा मला मी स्त्री आहे. म्हणून अनेक गोष्टींचे अडथळे येतात. स्त्रिया कधी ढोलकी वाजवता का असा प्रश्न विचारणारे अनेक जण आहेत. योगिता म्हणतात की, शंभर टक्के सक्षम फक्त परमेश्वर आहे.बाकी कोणीही नाही. सर्वसाधारण माणूस असो किंवा दिव्यांग असो कोणीही नकारार्थी विचार करू नये. प्रत्येकाने ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजचा रंग निळा, ‘शैलपुत्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar

नवोदित मंडळाची माऊली

News Desk

आजचा रंग पिवळा, ‘ब्रम्हचारीणी’ रूपात घ्या देवीचे दर्शन

News Desk