HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

आजचा रंग पांढरा, ‘कात्यायनी’ रूपात घ्या देवीचे दर्शन

नवरात्रीच्या सहाव्या माळेला आई जगतजननी ‘कात्यायनी’ या रूपात दर्शन देत आहे. आदिमाया आदिशक्तीचे दिलेल्या वरदानानुसार यांच्या पदरी कात्यायनी देवीने जन्म घेतला. कात्यायन ऋषींची कन्या म्हणून या देवीला कात्यायनी नाव पडले. व्रज भूमीत या देवीची प्रमुख पूजा केली जाते. कारण परब्रम्ह श्रीकृष्ण हे आपल्याला पतीरूपात भेटावे, यासाठी सर्व गोपिकांनी कात्यायनी देवीची आराधना केली.

वैवाहिक जीवनासाठी सुख शांती प्राप्त होण्यासाठी कात्यायनी देवीची विशेष आराधना केली जाते. आई कात्यायनी चतुर्भुज असून सिंहावर आरूढ झालेली आहे. आई कात्यायनीचा उजवा हात वरदहस्त आहे, तर दुसरा हात अभय हस्त आहे. डाव्या हातात विष्णुप्रिय पद्म आहे, तर दुसऱ्या हातात असुरांच्या संहारासाठी खड्ग धारण केले आहे.

या रूपात ही जगदंबा शांत व प्रसन्न दिसते. हे रूप पाहून सर्व देवगणांचं मन मोहून गेले. श्री मातेच्या भव्यदिव्य तेजाने सर्व विश्वातील भीतीयुक्त दुःख नष्ट होऊन प्रकाशरूपी नवजीवन, नवचैतन्य, नवउत्साहीत व आनंदित वातावरण निर्माण झाले. या आनंदात सर्व देवांच्या विनंतीनुसार साक्षात आदिनारायणाने या कात्यायनी देवीची स्तुती केली. या स्तुतीने आणि देवगण-भक्तगण यांच्या जयजयकाराने देवी प्रसन्न झाली आणि सर्व देवतांना वर देती झाली. या आनंदात सर्व देवतांनी आणि भक्तांनी या दिवशी संपूर्ण रात्र जागरण करून देवीच्या नवे गोंधळ घातला. श्री आई अंबिकेचा उदो उदो केला आणि संबळ-तुणतुण्याच्या तालावर गोंधळी हातात मशाल, टिटव्या, जागती ज्योत घेऊन गळ्यात कवड्याच्या माळा, आई जगदंबेचा मुखवटा, कवड्यांनी मढवलेली टोपी घालून रात्रभर सर्व देवांच्या नावे जागरण गोंधळाला आमंत्रित केले जाते. आदिशक्ती, आदिमायेच्या अवताराचे आणि पराक्रमाचे गोडवे गेले जातात आणि देवीला प्रसन्न करतात. वर्षानुवर्षे सुख, शांती, समृद्धीसाठी प्रार्थना तसेच क्षमायाचना देखील करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

घटस्थापना का करतात, तुम्हाला माहित आहे का ?

Gauri Tilekar

महिला उद्योजिका मीनल मोहाडीकर

News Desk

आजचा रंग निळा, ‘शैलपुत्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar
राजकारण

#मीटू मोहिमेला रामदास आठवलेंचा पाठिंबा

swarit

मुंबई । #मीटू या मोहिमेतून ज्या व्यक्तींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. मग ते नेता असो किंवा अभिनेता मग तो आरोपी असून त्यांच्यावर कादेशीर कारवाई झालीच पाहिजे असे मत केंद्रीय सामाजिकी न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ते असे देखील म्हटले की, #मीटू या मोहिमे द्वारे कोणावर ही निराधार आरोप लावण्याचे व्यासपीठ बनवू नये.या मोहिमे अंतर्गत कुणाचीही फसवणूक होय नये.

जर एखाद्या व्यक्ती महिलेला अपमानास्पद वागनू देत असेल तर देखील त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका आठवले यांनी मांडली आहे. आठवले यांनी पुढे असे म्हणाले की, #मीटू या मोहिमे द्वारे मोठ्या व्यक्तींना फसवण्याचं प्रयत्न केला जाऊन शकतो. त्यामुळे पोलिसांनी आरोपांची पडताळी केली पाहिजे.

मीटूचे वादळ आता देशभरात पसरले आहे. मीटू या मोहिमेत अनेक बॉलीवुडमध्ये ज्येष्ठ आणि प्रसिद्ध व्यक्तींवर आरोप लावण्यात आले आहे. यात तनुश्री दत्त्ता, कंगना राणावत, ज्वाला भट्टा, पूजा भट यांच्यासारख्या अनेक महिलांनी मीटू मोहिमेद्वारे आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एम.जे अकबर यांच्यावर #मीटू मोहिमेद्वारे आरोप लावण्यात आले आहेत. काल एम.जे अकबर यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

Related posts

…तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बोलावले तरी प्रीती भोजनाला जाणार नाही !

News Desk

“शिवसेनेचा मेळावा शिमग्यासारखा झाला,कारण…”, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Seema Adhe

इव्हीएम मशीनचा गैरवापर होतोय, नवाब मलिकांचा आरोप  

News Desk