HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

आजचा रंग पिवळा, ‘ब्रम्हचारीणी’ रूपात घ्या देवीचे दर्शन

आज नवरात्रीची दुसरी माळ आणि आजचा रंग पिवळा. दुसऱ्या माळेला देवी ब्रम्हचारीणी या रूपात भक्तांना दर्शन देते. या देवीला पद्म पुष्प जास्त प्रिय असल्याने देवीला कमलपुष्पानी सजविले जाते.

नाकीचा निर्मळ मोती मळवट भाळी रेखिती महाळुंग उजव्या हाती शिवलिंग मस्तकावरी आई अंबाबाईचा उदो उदो

हिंदू धर्मात वर्षातून दोन वेळा भगवती देवीची विशेष आराधना केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. आपल्याकडे शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत श्री दुर्गा देवीचे तत्व इतर दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक प्रमाणात कार्यरत असते, असे मानले जाते. त्याचा लाभ मिळावा यासाठी पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी महाकालीची, दुसरे तीन दिवस सत्त्वगुण वाढविण्यासाठी सत्त्वगुणी महालक्ष्मीची व शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी रजोगुणी महासरस्वतीची पूजा केली जाते.

ओम ब्रम्हचारीणी माताय नमः दधना करपद्याभ्यांक्षमालाकमंडलू देवी प्रसीदतु मयी ब्रम्हचारिण्यानयत्तमा

आज नवरात्रीची दुसरी माळ आणि आजचा रंग पिवळा. दुसऱ्या माळेला देवी ब्रम्हचारीणी या रूपात भक्तांना दर्शन देते. या देवीला पद्म पुष्प जास्त प्रिय असल्याने देवीला कमलपुष्पानी सजविले जाते. या अवतारात देवी द्विभुज असते. एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू धारण केलेला असतो. तसेच पांढऱ्या शुभ्र रंगाची वस्त्रे देवीने परिधान केली आहेत. द्वितीयेचा दिवशी सकल सृष्टीतील चौसष्ट योगिनी मिळून ब्रम्हचारीणी मातेची आराधना करतात.

ब्रम्हाची तू ब्रम्हा शक्ती, विष्णूची तू वैष्णवी, शंकराची शिवशक्ती तू विश्व व्यापक तू जगतजननी.

ब्रह्म देवाच्या शक्तीतून प्रकट झालेली ब्रह्मचारिणी ही ब्रम्हाची शक्ती म्हणून ओळखली जाते. तसेच विष्णूची अर्धांगिनी लक्ष्मी ही वैष्णवी म्हणून ओळखली जाते. तसेच देवांचे देव महादेवाची शक्ती ही शिवशक्ती म्हणून ओळखली जाते. जेथे शिव असतो तेथे शक्ती असते आणि जेथे शक्ती असते तेथे शिव असतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घटस्थापना का करतात, तुम्हाला माहित आहे का ?

Gauri Tilekar

आजचा रंग करडा, ‘कृष्माण्डा’ रूपात घ्या देवीचे दर्शन

News Desk

भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी

News Desk