HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

आजचा रंग जांभळा, ‘महागौरी’ रूपात घ्या देवीचे दर्शन

नवरात्रीच्या आठव्या माळेला म्हणजेच दुर्गाष्टमीला आई जगतजननी दुर्गा मायभवानी महागौरी या रूपात सर्व भक्तांना दर्शन देते. या रूपात महागौरी आई नंदीवर स्वार झालेली असून, ती चतुर्भुज आहे. मागील हातात त्रिशूळ असून, दुसरा हात अभयवचनाचा आहे. तसेच बाजूच्या हातात डमरू धारण केलेला आहे व त्यावरील हात वरदहस्त आहे. नवरात्र पर्वणीतील अत्यंत महत्त्वाची अश्विनशुद्ध अष्टमी. या अष्टमीचे महत्त्व लक्षात घेता हिला कालाष्टमी, दुर्गाष्टमी, महाष्टमी सुद्धा म्हणतात. या दिवशी चंडी हवन केले जाते.

हिमपुत्री गौरी हिने भगवान शिवशंकर हे आपल्याला पती म्हणून प्राप्त व्हावे यासाठी उपासना आणि घोर तपश्चर्या केली होती. अनेक वर्षांच्या जपानुष्ठानाने व तपश्चर्येने श्री गौरीच्या अंगावर वारूळ तयार होऊन मातीने ती खूप मलिन झाली. तिच्या या उग्र व घोर तपश्चर्येने देवाधिदेव महादेव प्रसन्न झाले आणि तिला वर देते झाले. शिवशंकराने गंगा मातेला आज्ञा केली की, ‘हिला मंगल स्नान करवून सुचिर्भूत करावे’. त्यामुळे श्री गौरी मातेचा वर्ण उजळला आणि पूर्वीपेक्षा ती तपश्चर्येच्या बळाने अतिशय तेजस्वी आणि गोरी झाली म्हणून ती महागौरी ओळखली जाते. गौरीच्या उपासनेने सर्व कुमारिकांना मनोवांछित पती प्राप्त होऊन त्यांचं वैवाहिक जीवन सुख शांती सम्रुद्धीने बहरून जाते.

श्री महागौरी माता भगवान शिवशंकराला अत्यंत प्रिय आहे. शंकराला धवल वर्ण प्रिय आहे म्हणून महागौरीने पांढरे वस्त्र परिधान केले आहे आणि नंदी वाहनावर आरूढ झालेली आहे. तिचे ध्यान करून साध्याभोळ्या भक्तीने पूजा केली असता श्री शिवपंचायतन प्रसन्न होते. शिवपंचायतन म्हणजे श्री गणेश, श्री कार्तिकेय, शिव शंकर, शिव अशोकसुंदरी, शिव पार्वती यांची अखंड कृपादृष्टी लाभते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समाजातील व्यसनाधीनतेच्या विरोधात ‘ती’ खंबीरपणे उभी

News Desk

नवोदित मंडळाची माऊली

News Desk

आजचा रंग हिरवा, ‘चंद्रघंटा’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar