HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

विक्रोळीच्या दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाची सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल

मुंबई । विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर परिसरातील विक्रोळीची दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यंदा आपल्या ४८व्या वर्षात पदार्पण करीत आहे. लवकरच हे मंडळ आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदर्पण करणार आहे. या मंडळाची देवी ‘विक्रोळीची दुर्गामाता’ या नावाने अत्यंत प्रसिद्ध आहे. १९७१ साली राजाराम कामेरकर यांनी या मंडळाची स्थापना केली. येथील दुर्गामाता मैदानात या ८ फुटांच्या देखण्या, सुंदर, कोल्हापुरी साज चढविलेल्या दुर्गामाता देवीची मूर्तिकार रमेश रावले यांनी साकारलेली मूर्ती विराजमान होते.

कामेरकर यांनी जेव्हा या मंडळाची स्थापना केली तेव्हा या मंडळाचे नाव ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ’ असे होते. तसेच त्या काळी या देवीला देखील विशेष असे नाव देण्यात आले नव्हते. इथले स्थानिक या देवीला ‘कामेरकरची देवी’ याच नावाने ओळखत असत. मात्र गेल्या १० ते १२ वर्षांपासून ही देवी ‘विक्रोळीची दुर्गामाता’ याच नावाने ओळखली जाऊ लागली. विशेष म्हणजे हे नवरात्रोत्सव मंडळ हे विक्रोळीतील सर्वात जुने नवरात्रोत्सव मंडळ आहे.

विक्रोळीची दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा पारंपारिक वाद्यांच्या तालावर खेळला जाणारा गरबा हा उपनगरातील सर्वात मोठा गरबा आहे, अशी माहिती मिळते. या मंडळाकडून दरवर्षी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर राबविली जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येते. या मंडळाकडून देवीच्या आगमनावेळी फटाके वाजवून प्रदूषण न करता ते पैसे साठविले जातात. त्या पैशांतून आदिवासी पाड्यांमधे किंवा इतर गरजू व्यक्तींना या दरवर्षी मंडळाकडून मदत केली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजचा रंग हिरवा, ‘चंद्रघंटा’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar

आजचा रंग लाल, ‘कालरात्री’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar

भारतातील पहिली सुवर्णपदक विजेती महिला कुस्तीपटू

News Desk