HW News Marathi
नवरात्रोत्सव २०१८

‘विक्रोळीच्या आई शिवाई’चे हे देखणे रूप

मुंबई । विक्रोळी पूर्व येथील कन्नमवारनगर परिसरात १९७९ साली शिवाई मित्र मंडळाची स्थापना झाली. याच शिवाई मित्र मंडळाची देवी ‘विक्रोळीची आई शिवाई देवी’ म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे. शिवाई देवीची ज्या चौकात स्थापना केली जाते तो चौक ‘शिवाई चौक’ याच नावाने ओळखला जातो. यंदा या मंडळाने आपल्या ३९ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

खरंतर १९७९ सालात जेव्हा ‘शिवाई मित्र मंडळा’ची स्थापना केली गेली तेव्हा त्या काळच्या काही लोकांनी मिळून येथे देवीचा फोटो लावून नवरात्रोत्सवाला सुरुवात केली होती. पुढच्याच वर्षी म्हणजे १९८० सालापासून २ फुटाची देवीची मूर्तीची स्थापना करून हा नवरात्रोत्सव पार पडला. मात्र त्यानंतरच्या वर्षांपासून शिवाई देवीची ९ फुटांची अत्यंत सुबक, सुंदर अशी मूर्ती मंडपात विराजमान होऊ लागली.

शिवाई देवीची ९ फुटांची ही अत्यंत प्रसन्न आणि सुंदर, देखणे अशी मूर्ती वर्षानुवर्षे ‘मूर्तिकार खातू’ यांच्याच कारखान्यात घडविली जात आहे. ‘शिवाई देवी’च्या मंडपात होणारा गरबा हा अत्यंत प्रसिद्ध आहे. शिवाई मित्र मंडळाकडून दरवर्षी सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी काही हलक्याफुलक्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘ती’ने परिस्थितीवर मात करत, जगासमोर ठेवला नवा आदर्श

News Desk

आजचा रंग करडा, ‘कृष्माण्डा’ रूपात घ्या देवीचे दर्शन

News Desk

शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ

Gauri Tilekar
देश / विदेश

त्रिपुराच्या राज्यपालांची अति घाई, मृत्यूपूर्वीच वाजपेयींना वाहिली श्रद्धांजली

News Desk

अगरताळा | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. सध्या वाजपेयी यांच्यावर दिल्लीतीलएम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाजपेयी यांच्या प्रकृतीत कालपासून सुधारणा होत नसल्याचे एम्स रुग्णालयाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये माध्यमातून सांगितले आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरात भारतीय प्रार्थना सुरू असताना त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांना ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली. परंतु काही वेळातच तथागत रॉय यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि मग त्यांनी ट्विट डिलीट करुन सोशल मिडीयावर जाहीर माफी मागितली आहे.

https://twitter.com/tathagata2/status/1029975209766539264

Related posts

आता समलैंगिक विवाहांसाठी लढाई

Gauri Tilekar

देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ | अजित पवार

News Desk

शोपियानमध्ये २ दहशतवाद्यांना जवानांनी घेरले

News Desk