HW Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar NCP | हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांनी सोडले मौन


माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरची जागा सोडायला तयार नसल्याचं सांगत हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. आठवडाभरापूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत दिले होते. या मेळाव्यात पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार टीका केली होती. आमच्यावर सभ्यतेचे संस्कार आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसने त्याचा गैरफायदा घेतला. एक नाही तर पाच लोकसभा निवडणुकीत त्यांचं काम केलं. पण आम्हाला काय मिळालं, असा सवाल देखील त्यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार, अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेला शब्द पाळला नाही. आमची फसवणूक केली असा घणाघात केला होता. यावर प्रथमच आज अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

Related posts

पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ कायम

News Desk

Navneet Rana | नवनीत राणा शेतकऱ्यांसाठी लोकसभेत गरजल्या..!

Arati More

निवडणूकीसाठी धार्मिक धृवीकरणाचे हत्यार ?

News Desk