HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar NCP | …म्हणून मी राजीनामा दिला !

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अजित पवारांचा राजीनामा मंजूर केला आहे. या राजीनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात होते. मात्र, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या दीर्घ चर्चेनंतर अजित पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. “शरद पवार यांच्यावर ईडीकडून दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे अस्वस्थ होऊन आपण हा राजीनामा दिल्याचे” अजित पवार यांनी स्पष्ट केलय. “मी माझ्या विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, माझ्या या अचानक कोणालाही न सांगता घेतलेल्या निर्णयामुळे पक्षाध्यक्ष पक्षातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी दुखावले गेले. त्यांची मी माफी मागतो. माझा राजीनाम्याचा निर्णय योग्य कि अयोग्य ते मला माहित नाही”, असे अजित पवार म्हणाले. यावेळी बोलताना अजित पवार यांना आपले अश्रू अनावर झाले. “आम्ही माणसे आहोत, आम्हालाही भावना आहे”, असे म्हणत अजित पवार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटळ्याच्या आरोपावरून भावुक झाले. ११,५०० कोटींच्या ठेवी असताना २५ हजार कोटींचा घोटाळा होईल कसा? असा प्रश्न देखील अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पाहूया या पत्रकार परिषदेत अजित पवार नेमके काय म्हणालेत ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खळबळजनक! धनजंय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप, ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार

News Desk

शपथविधीनंतर सत्यजित तांबे यांची प्रतिक्रिया

News Desk

Pooja Chavan आत्महत्या प्रकरणानंतर Sanjay Rathod आता नव्या वादात…

News Desk