HW News Marathi
व्हिडीओ

Balasaheb Thorat,Sharad Pawar Baramati | सत्तास्थापनेसाठी आज बारामतीतं थोरात आणि पवारांची खलबतं…

विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर महाआघाडीला सत्ता स्थापनेचे वेध लागले आहेत. शिवसेनेला सोबत घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याच संदर्भात आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीला 98 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 161 जागा मिळाल्या आहेत. त्यात शिवसेनेला वैयक्तिक 56 जागा मिळाल्या असल्याने कॉंग्रेस आघाडी शिवसेनेशी संबंध जोडून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे.त्यात पवार आणि थोरात यांची भेट होणार असल्याने महाआघाडी सत्ता स्थापनेचे प्रयत्न करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु शरद पवारांनी आपली विरोधात बाकावर बसण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. तर थोरात यांनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आजच्या भेटीत विरोधी पक्ष नेता ठरणार की सत्ता स्थापनेची समीकरण आखली जाणार हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.#BalasahebThorat #SharadPawar #NCP#BJp #Baramati

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aaditya जी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; BJP नेत्या Chitra Wagh यांच खरमरीत पत्र

News Desk

Neelam Gorhe वाचवणार Aaditya Thackeray यांची आमदारकी? व्हीप बाजावून Eknath Shinde यांची नवी खेळी

Manasi Devkar

खासदार संजय राऊत राज्यसभेत भाजपवर बरसले!

News Desk