HW News Marathi
व्हिडीओ

BJP च्या Chandrakant Patil यांनी Sharad Pawar यांची पोल खोल करणार असं म्हटलंय

मराठा आणि ओबीसी आरक्षणप्रश्‍नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य समाजाची दिशाभूल करणारं आहे. खर्‍याचा सामना करता येत नाही, म्हणून जनतेला खोटं सांगण्यासाठी खासदार शरद पवार दौरा करणार असतील, तर त्यांच्या ज्या ठिकाणी सभा होतील, त्या ठिकाणी भाजपच्यावतीनं दुसर्‍या दिवशी सभा घेवून पोलखोल केली जाईल, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. 58 वर्ष केंद्रात सत्ता असताना आरक्षणाची 50 टक्के मर्यादा शिथील का केली नाही, तेव्हा ते झोपा काढत होते का? असा संतप्त सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर या वयात खासदार शरद पवार यांनी गावभर दौरे करण्याची गरज नाही. पाच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येवून प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडल्यास, वस्तुस्थिती समोर येईल, असंही चंद्रकांतदादा म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर आज पत्रकार परिषद घेवून भूमिका मांडली.

#SharadPawar #ChandrakantPatil #BJP #NCP #MarathaReservation #OBCReservation #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कुठला बाले आणि कोणाचा किल्ला? आम्ही मानत नाही”; Ashish Shelar यांचा ShivSena ला टोला

Seema Adhe

Shrinivas Patil Satara | साताऱ्याच्या श्रीनिवास पाटलांनी घेतली खासदारकीची शपथ

Gauri Tilekar

केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर मदत मागावी लागणार नाही’ उद्धव ठाकरेंनी सुनावलं !

News Desk