HW News Marathi
व्हिडीओ

ShivSena MP Bhavana Gawali यांच्या संस्थेत 7 कोटी रुपये आले कुठून?, Kirit Somaiya यांचा सवाल!

“शिवसेनेच्या खासदार भावना गवळी पुन्हा नव्या प्रकरणामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत, खासदार भावना गवळी यांची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर कंत्राटदाराला धमकावल्याची ती ऑडिओ क्लिप होती असा आरोप करण्यात आला, यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र असं असलं तरी आता खासदार भावना गवळी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. किरीट सोमय्या यांनी पुण्यात गवळी यांच्यावर आरोप केल्यानंतर आता ट्वीट करत एक नवा आरोप केला आहे. भावना गवळी यांच्या कार्यालयातून पहाटे 5 वाजता ₹7 कोटी रोख नगदी चोरी? असा सवाल त्यांनी ट्वीट करत केला आहे. भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत 7 जुलै 2019 रोजी सकाळी 5 वाजता 7 कोटी नगदी रोख 11 लोकांनी चोरले अशी तक्रार 12 मे 2020 रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली आहे. एवढी रोख रक्कम आली कुठून? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

#BhavanaGawali #Shivsena #KiritSomaiya #BJP #Nitingadkari #Hwnewsmarthi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राऊतांनी केलेल्या ‘स्क्रिप्ट’च्या आरोपांवर बावनकुळेंचा पलटवार

News Desk

माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मीपण ‘सीडी’ लावणार ! राष्ट्रवादी प्रवेशावेळी खडसे गरजले …

News Desk

करेक्ट कार्यक्रमवरून Ajit Pawar म्हणाले “राजकारणातून संन्यास घ्यायला हवा”

News Desk