HW News Marathi
व्हिडीओ

“हिंदुहृदयसम्राट ते जनाब बाळासाहेब ठाकरे ! शिवसेनेची कौतुकास्पद कामगिरी”, भाजपने शिवसेनेला डीवचलं

महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाआघाडीचं सरकार आल्यापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल देत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. ‘आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही’, असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. पण त्यानंतर दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरुंग सकपाळ यांनी अजना स्पर्धा आयोजित केल्याने विरोधकांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते प्रकरण शांत होत असतानाच आता एका कॅलेंडरमुळे पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर २०२१ असं नमूद करण्यात आलं आहे. यावर मराठी इंग्रजीसोबतच उर्दू भाषेचाही वापर करण्यात आला आहे. तसंच यावर एका ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जनाब उद्धव ठाकरे आणि जनाब आदित्य ठाकरे असा करण्यात आला आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा शिवसैनिकांच्या जीव्हाळ्याचा विषय आहेच पण प्रत्येक मराठी माणसाचाही तो जीव्हाळ्याचा विषय आहे.

#BalasahebThackeray #UddhavThackeray #DevendraFadnavis #AtulBhatkhalkar #BJP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

8 लाख रुपयाचा रस्ता 4 महिन्यात धिंगाणा पालकमंत्री पांदन रस्त्याचे वाजले तीन तेरा!

News Desk

पाटील-विखे-शिंदेंना स्वतःच्याच गावात धक्का, तरीही ग्रामपंचायतीत ‘भाजप’च मारणार मुसंडी?

News Desk

Bhagat Singh Koshyari आणि Sudhanshu Trivedi यांच्यावर Sanjay Gaikwad भडकले

News Desk