HW News Marathi
व्हिडीओ

Chagan Bhujbal NCP | छगन भुजबळांना कधी भाजपात घेणार नाही !

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत . यापार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारेही वाहू लागले आहे . निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील बऱ्याच जणांना भाजपात यायचे आहे परंतु तावूनसुलाखून आम्ही मोजक्यांनाच घेत आहोत. याचे उदाहरण द्यायचे म्हणजे आम्ही पक्षात राधाकृष्ण विखे पाटील यांना घेतले पण छगन भुजबळांना नाही. कारण विखेंवर कसलेही आरोप नाहीत, असे वक्तव्य भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत . सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील भाजपामध्ये येऊन आता मंत्री झाले आहेत. सुजय विखे-पाटीलही खासदार आहेत. त्यामुळे तेथील जिल्ह्यांची चिंता आता नको. आता आम्हाला काँग्रेस संस्कृतीमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. इनकमिंगची संख्या प्रचंड असली तरी आमचा पक्ष ‘आओ जाओ घर तुम्हारा’ नाही. बाहेरून येणार्‍याना आम्ही आधी पारखून घेतो.#ChaganBhujbal n #NCP #ChandrakantPatil #RajThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्वास कुठून घ्यायचा हेही तुम्हीच ठरवणार का?- Jitendra Awhad

News Desk

पुण्याचं नामांतर होणार? Ajit Pawar म्हणाले…

News Desk

INS Vikrant घोटाळ्याप्रकरणी SIT नेमण्यात यावी; सैनिक फेडरेशनची पोलीस आयुक्त संजय पांडेंकडे मागणी

News Desk