HW News Marathi
व्हिडीओ

Chunabhatti Building | जीव मुठीत घेऊन राहतायत मिल कामगार

मुंबईमध्ये मोडकळीस आलेल्या इमारतींची कमतरता नाही. किती तरी इमारती या १०० वर्ष जुन्या झालेल्या आहेत. मात्र असे असतानाही तेथील रहिवासी या इमारती सोडून जाण्यास तयार नाही. परिणामी, तुफान पावसात तडे गेलेल्या या इमारती पत्त्यासारख्या कोसळतात आणि नाहक अनेक निष्पापांचा जीव त्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जातो. अशाच एका धोकादायक इमारतीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. चुनाभट्टीतील या ८० वर्ष जुन्या ४ मजली इमारतीतील काही भाग तुडला असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे. इतकेच नव्हे तर आपल्या घरापर्यंत ये-जा करण्यासाठी त्यांना रस्सीचा आधारदेखील घ्यावा लागत आहे. या व्हिडिओमधील इमारत ही चुनाभट्टीमधील असून ही इमारत न्याय प्रविष्ट आहे. अशा प्रकारच्या अनेक इमारती टाटानगर आणि चुनाभट्टीमध्ये असल्याचे समजते.#Chunabhatti #Mumbai #MillWorkers

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेच्या ‘एकला चलो रे’मुळे BJP चं टेंशन वाढलं?, ‘हा’ असेल पुढचा प्लॅन

News Desk

Sharad Pawar And Udayanraje| शरद पवारांचं नाव घेताचं उदयनराजे का रडले?

Arati More

शिंदे-भाजपचा विरोध Uddhav Thackeray यांना की उर्दूला?

Manasi Devkar