HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार ! बारामतीत खळबळ…

राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर आज (31 मे) संध्याकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात तावरे यांच्या पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुका हादरला आहे. रविराज तावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. तसेच ते जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती आहेत. माळेगावातील एक मोठी प्रस्थ म्हणून त्यांची ओळख आहेत. त्यांच्यावर अशाप्रकारे अचानक गोळीबार झाल्याने बारामतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

#AjitPawar #Baramati #RavirajTavre #RohiniTavre #Pune #Maharashtra #MahavikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mansukh Hiren हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार Sachin Vaze च!

News Desk

विनायक मेटेंनी धनंजय मुंडेंचं कौतुक करत पंकजांवर टिका का केली ?

News Desk

PM Cares Fund मध्ये पैसे येतात कुठून, जातात कुठे? Audit गायब?

News Desk