यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत काँग्रेसची नाराजी पुन्हा समोर येत असून यंदाही निमित्त आहे ‘निधी वाटप’. दरम्यान, काँग्रेस मंत्र्यांनी या आधी देखील निधी वाटपाबाबत नाराजी जाहीर केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी विभागवार घेतलेल्या बैठकांमध्ये काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात वार्षिक आराखड्यात निधी कमी केल्याची तक्रार काँग्रेसचे नेते करत आहेत. नेमके प्रकरण काय ? पाहूया
#AjitPawar #NanaPatole #UddhavThackeray #BalasahebThorat #Congress #Maharashtra #NCP #SharadaPawar #MahaVikasAaghadi #MahaBudget2021-22 #MaharashtraBudget