HW News Marathi
व्हिडीओ

कोरोना लशीवरून सीरम-बायोटेक कंपनीमध्ये नेमका काय वाद झाला?

संपूर्ण देशाला कोरोना लसीकरणाची प्रतीक्षा असताना आपत्कालीन वापराची परवानगी मिळालेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लस उत्पादन कंपन्यांमध्ये ‘लसकारण’ रंगण्याची चिन्हे आहेत. परिणामकारकतेची आकडेवारी उपलब्ध नसतानाही स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ लशीला परवानगी दिल्यामुळे होणाऱ्या टीकेला उत्पादक कंपनी भारत बायोटेकने सोमवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. लशीच्या २०० टक्के प्रामाणिक चाचण्या केल्या आहेत, आमच्यावरील टीका अनाठायी आहे, असे कंपनीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.फायझर, मॉडर्ना आणि आणि ऑक्सफर्डच्या लशी वगळून अन्य लशींवर ‘केवळ पाण्याइतक्या सुरक्षित’ अशा शब्दांत टीका करणाऱ्या ‘सीरम’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांचा नामोल्लेख टाळून ‘कोव्हॅक्सिन’ लशीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा इल्ला म्हणाले, ‘‘आम्ही २०० टक्के प्रामाणिकपणे लशीच्या चाचण्या केल्या असूनही आमच्यावर टीका करण्यात येते. जर माझे म्हणने चुकीचे असेल तर सांगा, पण काही कंपन्यांनी भारत बायोटेकच्या लशीला पाण्याची उपमा दिली आहे.

#SerumInstituteOfIndia #BharatBiotech #CovidVaccine #India #adarPoonawalla #KrishnaElla #Corona

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitin Gadkari यांनी सांगितला Gopinath Munde यांचा तो किस्सा

News Desk

राहुल गांधींची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये

Darrell Miranda

ठाकरे गटासाठी मोठी बातमी! संजय राऊत यांना जामीन मंजूर

Chetan Kirdat