कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या काळात संपूर्ण देशभरात कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. मात्र, अर्थव्यवस्थेचे चक्र रुळावर आणण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यासह देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामार्फत एक एक क्षेत्र खुली होण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (३० सप्टेंबर) राज्य सरकारकडून ‘अनलॉक-५’साठीच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने ५ ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार सुरु करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातील हॉटेल चालक-मालकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेल, रेस्टॉरंट्स सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी केली जात होती. स्वतः राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या मागणीची दाखल घेत राज्य सरकारला याबाबत विचार करण्याचे आवाहन केले होते. अखेर राज्य सरकारने आता या मागणीची दखल घेतली आहे.
#Unlock5 #Maharashtra #COVID19 #UddhavThackeray #Corona #HotelRestaurants